TRENDING:

'केस' नाही दिले म्हणून अक्षय खन्नाने सोडला Drishyam 3? मेकर्सनेच सांगितलं नेमकं काय झालं

Last Updated:
अभिनेता अक्षय खन्नाने दृश्यम 3 हा सिनेमा का सोडला असा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना पडला आहे. अखेर दृश्यमच्या मेकर्सनीच याचं खरं कारण सांगितलं.
advertisement
1/8
'केस' नाही दिले म्हणून अक्षय खन्नाने सोडला दृश्यम 3? मेकर्सनेच सांगितलं कारण
'दृश्यम 3' हा अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणारा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. जीतू जोसेफ दिग्दर्शित या चित्रपटात मोहनलाल आणि मीना मुख्य भूमिकेत आहेत. कमल हासन अभिनीत तमिळ रिमेक आणि अजय देवगण अभिनीत हिंदी रिमेक बनवण्यात आला आहे.
advertisement
2/8
मल्याळम चित्रपट 'दृश्यम' चा तिसरा भाग पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हिंदी चित्रपट 'दृश्यम' च्या तिसऱ्या भागाची रिलीज तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली. यासोबतच मुख्य अभिनेत्याने चित्रपटातून माघार घेतल्याच्या बातम्याही चर्चेत आल्या.
advertisement
3/8
अभिनेता अक्षय खन्ना दृश्यम 3 मध्ये दिसणार नसल्याचं बोललं जात आहे. अक्षय खन्नाने दृश्यम 3 ला नकार दिला आहे. अक्षय खन्ना आणि 'दृश्यम पार्ट 3' च्या टीममधील मतभेद यामागचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे.
advertisement
4/8
दृश्यमच्या दुसऱ्या पार्टमध्ये अक्षय खन्नाने विदाऊट विगशिवाय काम केलं आहे. अक्षय खन्नाने पार्टसाठी विग घालून दिसण्याची  इच्छा व्यक्त केली होती. एका सूत्राने सांगितले की, "अक्षयने विगची मागणी केली होती. चित्रपट निर्मात्यांनी त्याची मागणी मान्य केली नाही. कदाचित दुसऱ्या भागात त्याने विग न लावता काम केल्यामुळे असे होऊ शकते."
advertisement
5/8
त्याच्या मागण्या पूर्ण न झाल्यानंतर अक्षयने दृश्यमच्या तिसऱ्या भागातून माघार घेण्याचा निर्णय घेतला, असं म्हटलं जात आहे. 2022 मध्ये आलेल्या दृश्यम 2 मध्ये अक्षय खन्नाने इन्स्पेक्टर जनरल तरुण अलावतची भूमिका साकारली होती.
advertisement
6/8
सध्या त्याचा "धुरंधर"  हा सिनेमा चर्चेत आहे. त्याआधी तो छावा सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.  असं म्हणतात की छावा सिनेमानंतर अक्षय खन्नाने त्याची फी वाढवली. त्याची सध्याची फी ही 21 कोटी असल्याचं बोललं जात आहे. बजेटमुळे दृश्यम 3 चे निर्माते त्याला इतके मोठी रक्कम देऊ शकत नाही. त्यामुळेच अक्षय खन्ना सिनेमात दिसणार नसल्याचं बोललं जात आहे. पण याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
advertisement
7/8
'दृश्यम 3' च्या निर्मित्यांनी अक्षयशी मानधनाची वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. जर अक्षयला एवढी मोठी रक्कम मिळाली असती तर चित्रपटाचे बजेट उद्ध्वस्त झाले असते. अक्षयने त्याची मागणी वाजवी असल्याचे सांगितले. एका सूत्राने बॉलीवूड हंगामाला अशी माहिती दिली की,"अक्षय म्हणतो की त्याचे पात्र आणि चित्रपटाच्या विषयाबद्दलही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे. हा सिनेमा 500 कोटी कमावून देईल."
advertisement
8/8
मल्याळम चित्रपट 'दृश्यम 3' चे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. मल्याळम चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच हा चित्रपट इतर भाषांमध्ये प्रदर्शित होईल. अक्षय खन्नाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास तो "महाकाली" या तेलुगू सिनेमात दिसणार आहे. हा त्याचा पहिला तेलुगू सिनेमा असणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'केस' नाही दिले म्हणून अक्षय खन्नाने सोडला Drishyam 3? मेकर्सनेच सांगितलं नेमकं काय झालं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल