Akshaye Khanna : ऑस्कर मिळाला तरी घ्यायला येणार नाही! शनिवारी नेमका कुठे असतो अक्षय खन्ना? करतो काय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Akshaye Khanna : अभिनेता अक्षय खन्नाला ऑस्कर अवॉर्ड मिळाला आणि त्या दिवशी जर शनिवार असेल तर तो अवॉर्ड घ्यायलाही येणार नाही. असं का? शनिवारी कुठे असते अक्षय खन्ना? करतो काय?
advertisement
1/7

अभिनेता अक्षय खन्ना सध्या धुरंधर या सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमातील त्याच्या भूमिकेनं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. छावा सिनेमानंतर अक्षय खन्ना पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अक्षय खन्ना हा बॉलिवूडचा असा एक अभिनेता आहे जो स्टारकिड असूनही सगळ्या ग्लॅमरपासून दूर राहिला. ना बॉलिवूडच्या पार्ट्या ना कधी कोणत्या मोठ्या इव्हेंटमध्ये तो सहभागी होतं.
advertisement
2/7
अक्षय खन्नाची धुरंधर निमित्तानं सर्वत्र चर्चा होतेय अशातच त्याच्याबाबतीत एक गोष्ट सर्वांसमोर आली आहे. ती म्हणजे सोमवार ते शुक्रवार तो मुंबईत असतो. शनिवारी तो कुठेच जात नाही. मोठा पुरस्कार जरी मिळाला तरी तो घ्यायला जाणार नाही. शनिवारी अक्षय खन्ना नेमका जातो तरी कुठे?
advertisement
3/7
अक्षय खन्ना गेली अनेक वर्ष साऊथ मुंबईच्या त्याच्या घरी एकटा राहतोय. त्याला एकटं राहायला आवडतं. तो प्रचंड फूडी आहे. दुपारचं जेवण करत असताना रात्री काय खाणार आहे याचा विचार करत असतो. अक्षय खन्ना स्वत: ची कंपनी एन्जॉय करतो.
advertisement
4/7
एकदा एका कार्यक्रमाच्या निमित्तानं निर्माता करण जोहर याने अक्षय खन्नाबद्दल एक गोष्ट सांगितली. अक्षय खन्नाची ही सवय ऐकून सगळेच शॉक झाले. अक्षय खन्ना आणि अलिबागचं एक खास कनेक्शन आहे.
advertisement
5/7
करण जोहर म्हणाला होता, "सोमवार ते शुक्रवार हा मुंबईत असतो. शनिवारी तो अलिबागला जातो. त्याला शनिवारी अकॅडमी ( ऑस्कर ) जरी दिला तरी तो परत येणार नाही. कारण तो शनिवारी अलिबागमध्ये असतो."
advertisement
6/7
"ऑस्कर अवॉर्ड जरी मिळाला तरी तो म्हणेल आज नाही, आज विकेंड आहे, त्यामुळे घरातून बाहेर पडत नाही". करण जोहरनं पुढे असंही सांगितलं की, "आम्ही सिनेमाच्या कामासाठी रात्री भेटणार होतो पण अक्षय म्हणाला रात्री 9 खूप उशिरा होतंय, ही माझी झोपायची वेळ आहे."
advertisement
7/7
अलिबागमध्ये अक्षय खन्नाचं एक फार्महाऊस आहे. शांत, एकांत असलेली ही जागा अक्षय खन्नाला खूप आवडते. सोमवार ते शुक्रवारी मुंबईत राहून शनिवार - रविवार तो अलिबागच्या शांततेत घालवतो. त्याच्या सिनेमाचं स्क्रिप्ट देखील तो अलिबागमध्ये जाऊन वाचतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Akshaye Khanna : ऑस्कर मिळाला तरी घ्यायला येणार नाही! शनिवारी नेमका कुठे असतो अक्षय खन्ना? करतो काय?