TRENDING:

आधी नवऱ्यावर चीटिंगचे आरोप, आता सुनीता आहुजाची बॉलिवूडमध्ये जबरदस्त एन्ट्री, एकता कपूरची मोठी ऑफर!

Last Updated:
Sunita Ahuja Bollywood Entry: वयाच्या ५८ व्या वर्षी सुनीता आहुजा ग्लॅमरच्या या दुनियेत पाऊल ठेवत असून, त्यांचं बॉलिवूड पदार्पण आता निश्चित झालं आहे.
advertisement
1/10
आधी नवऱ्यावर चीटिंगचे आरोप, आता सुनीता आहुजाची बॉलिवूडमध्ये जबरदस्त एन्ट्री, एकत
बॉलिवूडचा 'नंबर वन' स्टार गोविंदा याच्या मागे खंबीरपणे उभी राहणारी त्याची पत्नी सुनीता आहुजा आपल्या बिनधास्त आणि रोखठोक वक्तव्यांसाठी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
advertisement
2/10
कधी कौटुंबिक वादावर भाष्य, तर कधी गोविंदाच्या अफेअर्सवर दिलेली खळबळजनक उत्तरं... सुनीता आहुजा यांनी नेहमीच आपल्या स्टाईलने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
advertisement
3/10
पण आता चर्चा त्यांच्या विधानांची नाही, तर त्यांच्या नव्या इनिंगची आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी सुनीता आहुजा ग्लॅमरच्या या दुनियेत पाऊल ठेवत असून, त्यांचं बॉलिवूड पदार्पण आता निश्चित झालं आहे.
advertisement
4/10
एका मीडिया रिपोर्टनुसार, सुनीता आहुजा यांनी चक्क एकता कपूर यांच्या 'बालाजी मोशन पिक्चर्स'सोबत आपली पहिली फिल्म साईन केली आहे. अद्याप या चित्रपटाचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही, पण या प्रोजेक्टमध्ये सुनीता एक अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
advertisement
5/10
विशेष म्हणजे, या भूमिकेसाठी त्या तब्बल २० दिवस शूटिंग करणार आहेत. ज्या पद्धतीने त्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये आपली छाप सोडतात, ते पाहता पडद्यावरही त्यांचा जलवा काही औरच असेल, यात शंका नाही.
advertisement
6/10
गेल्या वर्षभरात सुनीता आहुजा त्यांच्या खाजगी आयुष्यामुळे खूप चर्चेत होत्या. एका मुलाखतीत त्यांनी गोविंदाच्या लग्नानंतरच्या कथित प्रेमप्रकरणांवर उघडपणे भाष्य केलं होतं, ज्यामुळे आहुजा कुटुंबात मोठी खळबळ उडाली होती.
advertisement
7/10
त्यानंतर स्वतः गोविंदाला समोर येऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. गोविंदा म्हणाला होता की, "कधीकधी शांत बसण्याला लोक आपली कमजोरी समजतात, म्हणून मला बोलावं लागलं." या सर्व वादांना मागे सारून आता सुनीता यांनी आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला आहे.
advertisement
8/10
केवळ सुनीताच नाही, तर गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा याच्याही पदार्पणाची जोरदार तयारी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यशवर्धन लवकरच साजिद खानच्या एका हॉरर चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत 'लापता लेडीज' फेम नितांशी गोयल मुख्य भूमिकेत असेल.
advertisement
9/10
'हंड्रेड' असं या चित्रपटाचं नाव असल्याचं बोललं जातंय. म्हणजे आता एकाच वेळी आई आणि मुलगा दोघंही बॉलिवूडमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
advertisement
10/10
सुनीता आहुजा यांनी नेहमीच पडद्यामागून गोविंदाचं करिअर सांभाळलं. आता स्वतः कॅमेऱ्यासमोर येण्याचा त्यांचा निर्णय धाडसी आणि तितकाच कौतुकास्पद मानला जात आहे. त्यांच्या या नव्या भूमिकेत गोविंदाची एखादी स्पेशल अपिअरन्स असेल का, याकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आधी नवऱ्यावर चीटिंगचे आरोप, आता सुनीता आहुजाची बॉलिवूडमध्ये जबरदस्त एन्ट्री, एकता कपूरची मोठी ऑफर!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल