अमिताभ बच्चन यांनी लाखो चाहत्यांची मागितली माफी, पहाटे 5.30 वाजता असं घडलं तरी काय?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांची माफी मागितली आहे. एक गोष्ट विसरल्याने त्यांनी ब्लॉगच्या माध्यमातून माफी मागितली आहे.
advertisement
1/7

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज वयाच्या 83 व्या वर्षीही सक्रीय आहेत. 'कौन बनेगा करोडपती 17' या कार्यक्रमाचं होस्टिंग करताना ते दिसत आहेत. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जगभरातील चाहत्यांसोबत ते जोडले गेले आहेत.
advertisement
2/7
अमिताभ बच्चन सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यासंबंधित अडपेट ते शेअर करत असतात. ट्वीट आणि ब्लॉगच्या माध्यमातून व्यक्त होताना ते दिसतात.
advertisement
3/7
अमिताभ बच्चन यांनी आता आपल्या नव्या ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांची माफी मागितली आहे. आपल्या ब्लॉगमध्ये बिग बी यांनी लिहिलं आहे,"सकाळी 5.30 वाजेपर्यंत काम करत होतो. त्यामुळे ब्लॉग लिहायला आणि चाहत्यांच्या कमेंट्सला उत्तर द्यायला विसरलो. त्यामुळे मी जाहीर माफी मागतो आणि खेद व्यक्त करतो".
advertisement
4/7
अमिताभ बच्चन यांनी याआधीच्या ब्लॉगमध्येही कामात व्यस्त असल्याचे संकेत दिले होते. 10 डिसेंबर 2025 रोजीच्या ब्लॉगमध्ये बिग बी यांनी लिहिलं होतं,"सिंहाच्या कातडीवर काळ्या रेघा. छाती पे हमरे लगें फू फू फुफकारें. वेळेपेक्षा वेगाने धावत काही महत्त्वाच्या मिटिंगसाठी जात आहे… आजसाठी… उद्यासाठी आणि कदाचित पुढच्यासाठी. आपल्या ब्लॉगमध्ये त्यांनी अनेक इमोजीही वापरले होते".
advertisement
5/7
अमिताभ बच्चन यांचा जवळचा मित्र अर्थात धर्मेंद्र यांचे नुकतेच निधन झाले आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर बिग बी भावूक झाले होते. सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत त्यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं होतं. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर 37 तासांनी अमिताभ बच्चन यांनी हे ट्विट केलं होतं.
advertisement
6/7
अमिताभ बच्चन यांचा शेवटचा 'कल्कि 2898 एडी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होतात. या बिग बजेट चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत प्रभास, दीपिका पादुकोण आणि कमल हासन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटात बिग बी यांनी 'अश्वत्थामा' हे पात्र साकारलं होतं. या चित्रपटाने जगभरात 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला.
advertisement
7/7
अमिताभ बच्चन यांनी आपल्या 56 वर्षांच्या करिअरमध्ये अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपट दिले आहेत. 2026 मध्येही त्यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे बिग बींच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अमिताभ बच्चन यांनी लाखो चाहत्यांची मागितली माफी, पहाटे 5.30 वाजता असं घडलं तरी काय?