Amruta Khanvilkar First Salary : काचा पुसायची, लेन्स विकायची; अमृता खानविलकरची पहिली नोकरी, किती होता पगार?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Amruta Khanvilkar Salary : अभिनेत्री अमृता खानविलकर गेली अनेक वर्ष मराठी तसंच हिंदी सिनेसृष्टीत काम करतेय. अमृताचा पहिला जॉब आणि पहिली सॅलरी किती होती माहितीये?
advertisement
1/10

अभिनेत्री अमृता खानविलकर ही गेली अनेक वर्ष मराठी तसंच हिंदी सिनेसृष्टीत काम करतेय. अत्यंत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अमृता खानविलकर आहे. अभिनयासोबतच नृत्य, फॅशन आणि स्टेज परफॉर्मन्स या सगळ्यासाठी अमृता ओळखली जाते.
advertisement
2/10
अमृताचं संपूर्ण शिक्षण हे पुण्यात आलं आहे. तिला लहानपणापासून नृत्याची आवड होती. ती सध्या कथ्थक नृत्याचं शिक्षणही घेत आहे. अभिनय क्षेत्रात येण्याआधी अमृता विविध डान्स तसंच रिअलिटी शोमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचली.
advertisement
3/10
अमृताने 2006 साली गोलमाल या सिनेमातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर 'कट्यार काळजात घुसली', 'नटरंग', 'चंद्रमुखी', 'राझी', यांसारख्या अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांत तिनं वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. नटरंग मधील वाजले की बारा या लावणीमुळे अमृता घराघरात पोहोचली. त्यानंतर अनेक वर्षांनी चंद्रा या लावणीमुळे अमृतानं पुन्हा प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
advertisement
4/10
पण तुम्हाला माहिती आहे का अभिनय क्षेत्रात येण्याआधी अमृता खानविलकर अनेक ठिकाणी काम करत होती. तिनं चश्म्याच्या दुकानात काम केलं आहे. तिथे झाडू, काचा पुसण्याचंही काम केलं आहे. तिचा पहिला पगार किती होता माहितीये?
advertisement
5/10
नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना अमृताच्या आयुष्याची पडद्यामागची गोष्टी पहिल्यांदाच समोर आली. अमुक तमुकला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अमृताने पुण्यात ज्या ठिकाणी काम करत होती त्याबद्दल सांगितलं.
advertisement
6/10
अमृता म्हणाली, "सुयोग ऑप्टिक्समध्ये काऊंटवर मी लेन्स विकायचे. मी तिथे महिना दीड महिना काम केलं. माझा महिना पगार 500 रुपये होता."
advertisement
7/10
"त्या काकांनी पहिल्या दिवशी बक्षीस म्हणून 50 रुपये दिले होते. मी खूप खुश झाले होते. माझ्या कमाईचे 50 रुपये. मी तिथे काऊंटर पुसायचे, काच पुसायचे, असं सगळं केलंय मी."
advertisement
8/10
अमृता पुढे म्हणाली, "दुकानासमोर एक होर्डिंग असायचं. माझ्या मनात एक वेडी इच्छा होती. मी त्या होर्डिंगकडे पाहून असं वाटायचं की मी कधी तरी त्या होर्डिंगवर येईन."
advertisement
9/10
"मग हळू हळू पुण्यात मॉडेलिंग सुरू केलं. साडीचे कॅटलॉग असतात त्यासाठी फोटोशूट केलं. 50 साड्या नेसल्या, फोटो काढले त्याचे मला तीन हजार रूपये मिळाले होते. आम्ही 24 तास शूट करत होतो. सकाळी 8 ला सुरू केलं होतं ते दुसऱ्या दिवशी सकाळी 8 पर्यंत आम्ही शूट केलं होतं आणि तीन हजार रुपये मला मिळाले होते."
advertisement
10/10
अमृताच्या सध्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास अमृतानं आता रंगभूमीवर पदार्पण केलं आहे. तिचं 'लग्न पंचमी' हे नवं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता स्वप्निल जोशी बरोबर ती रंगमंचावर दिसणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Amruta Khanvilkar First Salary : काचा पुसायची, लेन्स विकायची; अमृता खानविलकरची पहिली नोकरी, किती होता पगार?