अचानक लग्न करून सगळ्यांना दिला धक्का! अपूर्वा नेमळेकरने सांगितली तनुज गोवळकरशी पहिल्या भेटीची स्टोरी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Apurva Nemlekar : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचं अचानक लग्न झाल्यानंतर तिचं कसं, कुठे आणि कधी जमलं हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे. लग्नानंतर तिने तनुज गोवळकरसोबतची तिची लव्ह स्टोरी सांगितली आहे.
advertisement
1/7

सगळ्यांची लाडकी शेवंता अपूर्वा नेमळेकरने वॅलेंटाइन डेला तनुज गोवळकरसोबत लग्न करून सगळ्यांना आश्चर्याचा आणि सुखाचा धक्का दिला. यानंतर अपूर्वा तनुजला कशी, कुठे आणि कधी भेटली? त्यांच्या लव्ह स्टोरीबाबत जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे.
advertisement
2/7
लग्नानंतर अपूर्वा आणि तनुज दोघांनी आपली लव्ह स्टोरी सांगितली आहे. पहिली भेट कशी आणि कुठे झाली, प्रपोज कुणी, कुणाला केलं? पहिल्या डेटिंगपासून प्रपोजपर्यंत सगळं काही त्यांनी सांगितलं आहे.
advertisement
3/7
अपूर्वाने सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. ज्या तिने तिच्या पहिल्या डेटिंगचे फोटो शेअर केले आहेत. तर तनुजने प्रपोजचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
advertisement
4/7
पहिल्या डेटिंगच्या पोस्टमध्ये ती एका रेस्टॉरंटमध्ये दिसते आहे. जिथं तिने सुरुवातीला केकचा फोटो शेअर केला आहे. ज्यावर To new beginnings असं लिहिलं आहे.
advertisement
5/7
या भेटीबाबत सांगताना अपूर्वा म्हणाली, पहिली भेट म्हणजे परफेक्शनबाबत नव्हती. ही एखाद्याच्या सान्निध्यात शांतता शोधण्याची होती. ती दुपार, हास्य, शांतत आणि समुद्राच्या झुळकेत.
advertisement
6/7
मला जाणीव झाली की काही लोक तुमच्या आयुष्यात अगदी गाजावाजा करत येत नाहीत. ते फक्त फीट होता
advertisement
7/7
तर तनुजने प्रपोजचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात ते दोघं एका समुद्रकिनाऱ्यावर एन्जॉय करताना दिसत आहेत आणि तनुज तिला रिंग घालून प्रपोज करतो. वीकेंड फिरायला गेले असताना त्याने प्रपोज केल्याचं सांगितलं. प्रपोजची तारीखही त्याे दिली आहे. 23 नोव्हेंबर 2025 ला त्याने तिला प्रपोज केलं आणि ती हो म्हणाली.(सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अचानक लग्न करून सगळ्यांना दिला धक्का! अपूर्वा नेमळेकरने सांगितली तनुज गोवळकरशी पहिल्या भेटीची स्टोरी