Baipan Bhari Deva Box Office Collection : मराठी सिनेमाची गगनभरारी! बाईपण भारी देवाची 100 कोटींकडे वाटचाल, मोडला 'वेड'चा रेकॉर्ड
- Published by:Minal Gurav
Last Updated:
दिग्दर्शक केदार शिंदे यांचा बाईपण भारी देवा हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर कमालीचं यश मिळवतो. वेड सिनेमाचा रेकॉर्ड तोडून बाईपण भारी देवा सिनेमानं 100 कोटींकडे वाटचाल सुरू केली आहे.
advertisement
1/7

प्रमुख स्त्री पात्र असलेल्या या सिनेमानं संपूर्ण महाराष्ट्र लक्ष वेधलं आहे. सिनेमानं अवघ्या 30 दिवसांत रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.
advertisement
2/7
बाईपण भारी देवा या सिनेमानं 30 दिवसात तब्बल 83.50 कोटींची ब्लॉकबस्टर कमाई केली आहे.
advertisement
3/7
83.50 कोटींची कमाई करत बाईपण भारी देवा या सिनेमानं रितेश देशमुखच्या वेड सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे.
advertisement
4/7
30 डिसेंबर 2022 ला रिलीज झालेल्या वेड सिनेमानं 2023 वर्षाची दणक्यात सुरूवात करत तब्बल 75 कोटींची कमाई केली होती. पण रेकॉर्ड आता बाईपण भारी देवा सिनेमानं मोडला आहे.
advertisement
5/7
या आधी नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमानं 110 कोटींची कमाई करत मराठी सिनेमात पहिल्यांदा इतिहास घडवला. मागील 7 वर्षात सैराटने सगळ्या मराठी सिनेमांना तगडी टक्कर दिली.
advertisement
6/7
पण आता बाईपण भारी देवा हा सिनेमाची 100 कोटींच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
advertisement
7/7
बाईपण भारी देवा हा सिनेमा नक्कीच 100 कोटींचा टप्पा आरामात पार पाडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Baipan Bhari Deva Box Office Collection : मराठी सिनेमाची गगनभरारी! बाईपण भारी देवाची 100 कोटींकडे वाटचाल, मोडला 'वेड'चा रेकॉर्ड