पैशांची चणचण अन् मुंबईतल्या चाळीतलं बालपण, 'बारामुल्ला' फेम अभिनेता म्हणाला, 'तिथे राहायला लागलो तर...'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
मानव कौलने बारामुल्ला या फेस सिनेमातून लोकप्रियता मिळवली. मुंबईच्या चाळीतले दिवस, संघर्ष, साहित्य आणि चित्रकलेवरील प्रेम त्याने मुलाखतीत सांगितले.
advertisement
1/8

बारामुल्ला या फेस सिनेमातील अभिनेता मानव कौलने प्रेक्षकांची मनं जिकली. त्याने अलिकडेच एका मुलाखतीत बोलताना त्याचं बालपण, संघर्ष आणि मुंबईतील चाळीतील दिवसांच्या आठवणी सांगितल्या. हार न मानता कठोर परिश्रमातून आपली ओळख निर्माण करणाऱ्या मानवचं सर्वत्र कौतुक होत आहे.
advertisement
2/8
मानव म्हणाला, "जीवनातला संघर्ष किंवा गरिबी यांचा थेट परिणाम तुमच्यावर होतो, अस मला वाटत नाही. मी मुंबईच्या चाळीत राहत होतो, ते दिवस माझ्यासाठी संघर्षमय नव्हते तर सुंदर होते. कारण तेव्हा मला खूप वेळ असायचा. माझ्या हातात विनोद कुमार शुक्ल, निर्मल वर्मा यांची पुस्तक होती. तीच माझी करमणूक होती. गोर्की, दोस्तोव्हस्की आणि सॉल बेलो मी वाचायचो."
advertisement
3/8
"संघर्षानेच मला आकार दिला पण संघर्षच तुम्हाला घडवतो असं नाही. सत्यजित रे एका श्रीमंत कुटुंबातून आले होते मग त्यांनी पाथेर पांचाली कशी बनवली. माणूस नेहमीच त्याचं गोष्टी करतो ज्या त्याला आकर्षित करतात."
advertisement
4/8
मानव पुढे म्हणाला, "मला नेहमीच साहित्य, सिनेमा आणि चित्रकलेविषयी अपार आकर्षण होतं. मी नेहमी त्यांच्याच मागे धावत राहिलो. आजही मी युरोपसारख्या देशात गेलो की, पर्यटनाच्या ठिकाणी जाण्याऐवजी लेखक, चित्रकार यांच्या निवासस्थानांना भेट देतो. त्यात मी माझा आनंद शोधतो."
advertisement
5/8
"मला नेहमी साहित्य, चित्रपट आणि चित्रकलेची आवड आहे. आता मी काही पैसे कमवले आहेत. जरी मी यूरोपला गेलो तरी मी लेखक किंवा चित्रकार शोधत असतो. ते कुठे राहत होते, कसे जगत होते. मी कधीही पर्यटन स्थळांना जात नाही. मला त्यात रस नाही."
advertisement
6/8
चाळीतल्या दिवसांबद्दल बोलताना मानव म्हणाला, "मी चाळीत घालवलेली वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवसांपैकी होती. आम्ही खूप हसायचो. आमच्याकडे गमावण्यासारखं काही नव्हतं. जेव्हा काही मिळायचं तेव्हा आम्ही खूप आनंदी व्हायचो, ‘अरे, मला हे कसं मिळालं?’ असा विचार करायचो."
advertisement
7/8
"आम्ही इथे अपयशी आहोत या भावनेने आलो होतो. त्यामुळे रात्री चांगलं जेवण मिळालं तरी मला समाधानी वाटायचं."
advertisement
8/8
"जर मला ते बराच काळ दिसलं नाही तर मला ते जास्त आवडतं. पुढे काय होईल याचा मी विचार करत नाही. आजही, जर मी चाळीत गेलो आणि तिथे राहायला लागलो, तर मला ते खूप आवडेल."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पैशांची चणचण अन् मुंबईतल्या चाळीतलं बालपण, 'बारामुल्ला' फेम अभिनेता म्हणाला, 'तिथे राहायला लागलो तर...'