TRENDING:

हा तर 'पुष्पा'चा बाप निघाला! 15500000 किमतीचं सोनं, पठ्ठ्याने अशा ठिकाणी लपवलं, अधिकारीही चक्रावले

Last Updated:
DRI ने हैद्राबादमध्ये इस्त्रीमधून 1.196 किलो सोन्याचे 11 बार जप्त केले. दोन आरोपी अटकेत असून चौकशी सुरू आहे. चोरीची शक्कल पाहून अधिकारीही चकित झाले.
advertisement
1/6
हा तर 'पुष्पा'चा बाप निघाला! 15500000 किमतीचं सोनं, पठ्ठ्याने अशा ठिकाणी लपवलं
पुष्पा सिनेमा तुम्ही पाहिलाच असेल, त्यामध्ये लाल चंदनाची तस्करी करण्यासाठी पुष्पा वेगवेगळ्या स्टाइल वापरतो, पोलीस अधिकाऱ्यांना त्याचा थांगपत्ताही लागत नाही. असाच काहीसा प्रकार सोन्याच्या बाबतीत घडला, मात्र पुष्पासारखी युक्ती वापरली पण त्याची चोरी मात्र पकडली गेली आणि त्याने जी शक्कल लढवली होती ती पाहून अधिकारी देखील चक्रावले आहेत.
advertisement
2/6
पठ्ठ्याने चक्क एक कोटी 55 लाख रुपयांचं सोनं चक्क एका इस्त्रीमधून आणलं, वाचून तुम्हाला पण धक्का बसला ना, पण पठ्ठ्याने एका स्त्रीमधून एवढं सोनं आणलं. मात्र त्याची ही चोरी अधिकाऱ्यांनी पकडली, त्याने ज्या पद्धतीनं हे सोनं आणलं ते पाहून तर तुम्ही म्हणाल बापरे हा तर पुष्पाचा बापच निघाला.
advertisement
3/6
1.196 किलो सोन्याचे बार जप्त केले आहेत. DRI ने हैद्राबादमध्ये ही कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून चौकशी सुरू आहे. गुप्तचर विभागाकडून माहिती मिळाल्यानंतर या दोघांकडील इस्री ताब्यात घेण्यात आली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला.
advertisement
4/6
14 नोव्हेंबर रोजी जेव्हा दोघंजण आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका बॉक्ससह दिसले. त्या बॉक्सची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये इस्री होती. वरवर पाहता इस्री दिसत होती मात्र त्यामध्ये खजाना दडला होता.
advertisement
5/6
अधिकाऱ्यांनी संपूर्ण इस्री उघडली त्यात शेवटच्या कप्प्यात काळ्या रंगात रॅप करुन सोन्याचे बार लपवून ठेवण्यात आले होते. ते सगळे उघडल्यानंतर पोलीस हैराण होते. जवळपास 11 सोन्याचे बार हे आरोपींनी शक्कल लढवून लपवून ठेवण्यात आले होते.
advertisement
6/6
सीमाशुल्क कायदा, १९६२ च्या कलम ११० अंतर्गत ११ सोन्याच्या बार जप्त करण्यात आले. कायद्याच्या कलम १०४ अंतर्गत प्रवाशाला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
हा तर 'पुष्पा'चा बाप निघाला! 15500000 किमतीचं सोनं, पठ्ठ्याने अशा ठिकाणी लपवलं, अधिकारीही चक्रावले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल