TRENDING:

Dharmendra Daughter-in-law : आमिर खानची हिरोईन, धर्मेंद्रची सून बनण्यासाठी सोडलं हॉलिवूड, पॅन इंडिया स्टार आता जगतेय असं आयुष्य...

Last Updated:
Dharmendra Daughter-in-law : धर्मेंद्र यांच्या कुटुंबात आणखी एक सदस्य आहे, जिचे कनेक्शन केवळ हिंदी सिनेमाशी नव्हे, तर हॉलिवूडशी देखील होते. कुटुंबासाठी या अभिनेत्रीने आपले करिअर पणाला लावले.
advertisement
1/7
आमिरची हिरोईन, धर्मेंद्रची सून बनण्यासाठी सोडलं हॉलिवूड, आता जगतेय असं आयुष्य...
मुंबई: बॉलिवूडमध्ये धर्मेंद्र यांचे कुटुंब नेहमीच आपल्या साधेपणामुळे चर्चेत असते. धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर, तसेच सनी आणि बॉबी देओल यांच्या पत्नी पूजा आणि तान्या देओल या लाईमलाईटपासून दूर राहतात.
advertisement
2/7
पण या कुटुंबातील आणखी एक सदस्य आहे, जिचे कनेक्शन केवळ हिंदी सिनेमाशी नव्हे, तर हॉलिवूडशी देखील होते. कुटुंबासाठी या अभिनेत्रीने आपले चमकदार करिअर पणाला लावले. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून, धर्मेंद्र यांचे चुलत भाऊ पंजाबी अभिनेते वीरेंद्र यांचा मुलगा रणदीप आर्या यांच्या पत्नी दीप्ती भटनागर आहेत.
advertisement
3/7
उत्तर प्रदेशातील मेरठ येथे जन्मलेल्या दीप्ती भटनागर यांना लहानपणापासूनच मॉडेलिंगची आवड होती. हँडीक्राफ्ट व्यवसायासाठी त्या मुंबईत आल्या, पण १८ व्या वर्षी त्यांनी ब्युटी पेजेंट जिंकून मॉडेलिंगला सुरुवात केली.
advertisement
4/7
अवघ्या एका महिन्यात त्यांच्या बँक खात्यात १ लाख रुपये जमा झाले होते. त्यांनी सांगितले होते, "मॉडेलिंगमध्ये खूप पैसे मिळायचे." याच पैशातून दीप्तीने आपले पहिले घर जुहूमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्याकडून खरेदी केले होते. माधुरीचे घर विकत घेतल्याचा आनंद त्यांना खूप झाला होता.
advertisement
5/7
दीप्ती भटनागर यांनी केवळ हिंदीतच नव्हे, तर दाक्षिणात्य आणि हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. १९९५ मध्ये 'राम शास्त्र' या चित्रपटातून त्यांनी अभिनयात पदार्पण केले. 'राम शास्त्र'मध्ये आदित्य पंचोली, मनीषा कोईराला, जॅकी श्रॉफ होते.
advertisement
6/7
दीप्ती यांनी 'मन' या आमिर खानच्या चित्रपटात काम केले होते. दीप्ती यांनी तेलुगू आणि तमिळ चित्रपटांसोबतच हॉलिवूड चित्रपट देखील केले. त्यांच्या एका इंग्लिश चित्रपटात आर. माधवन देखील दिसले होते.
advertisement
7/7
हॉलिवूडपर्यंत पोहोचल्यानंतरही दीप्ती यांनी रणदीप आर्या यांच्याशी लग्न करून आपले करिअर पूर्णपणे सोडले. धर्मेंद्रच्या कुटुंबाची सून झाल्यानंतर त्यांनी आपला जास्त वेळ घर आणि मुलांच्या संगोपनात घालवला. चित्रपटसृष्टी सोडल्यानंतर दीप्ती यांनी आता व्लॉगिंगसुरू केले आहे आणि त्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dharmendra Daughter-in-law : आमिर खानची हिरोईन, धर्मेंद्रची सून बनण्यासाठी सोडलं हॉलिवूड, पॅन इंडिया स्टार आता जगतेय असं आयुष्य...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल