'जर ती इतकीच संस्कारी...', BB19 संपून उलटले 2 महिने, तरी तान्या-कुनिकाचा वाद संपेना, 60 वर्षांच्या अभिनेत्रीने ट्रोलर्सना झोडपलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Kunickaa Sadanand-Tanya Mittal: तान्या मित्तल-कुनिका सदानंदमधील वाद आता बिग बॉसच्या घरातून थेट सोशल मीडियाच्या रिंगणात पोहोचला आहे. कुनिकाने आपल्या डॅशिंग स्टाइलमध्ये ट्रोलर्सना आणि तान्याला झापलंय.
advertisement
1/7

रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस १९' संपून आता बराच काळ उलटला असला, तरी घरातील स्पर्धकांमधील वाद अजूनही संपलेला नाही. उलट, आता हा वाद सोशल मीडियाच्या मैदानात अधिकच पेटला आहे. अभिनेत्री कुनिका सदानंद आणि तान्या मित्तल यांच्यातील नातं घराबाहेर आल्यावर पुन्हा एकदा बिघडलं आहे.
advertisement
2/7
तान्या मित्तलच्या चाहत्यांनी कुनिकाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, पण कुनिकाने आपल्या डॅशिंग शैलीत या ट्रोलर्सना आणि तान्याला असं काही झापलंय की सध्या इंटरनेटवर याच वादाची चर्चा रंगली आहे.
advertisement
3/7
तान्या मित्तल सध्या विविध मुलाखतींमधून बिग बॉसच्या घरातील आपल्या अनुभवांवर आणि सह-स्पर्धकांवर भाष्य करत आहे. या मुलाखती पाहून तान्याच्या काही चाहत्यांनी कुनिका सदानंदला टॅग करत, तिच्यावर 'अँटी-तान्या' पोस्ट शेअर केल्याचा आरोप केला.
advertisement
4/7
यावर कुनिकाचा पारा चढला. तिने एका नेटिझला उत्तर देताना लिहिलं, "मला डिवचण्याची हिंमत करू नकोस. मी या चटपुंज्या लोकांना घाबरत नाही. मी वाघीण आहे, समजलं? तान्या मुलाखतींमध्ये माझ्याविरोधात बोलतेय, पण मी तिच्याबद्दल कधीही अपशब्द वापरलेले नाहीत."
advertisement
5/7
कुनिका एवढ्यावरच थांबली नाही, तिने तान्या मित्तलच्या 'बिग बॉस'मधील वागण्यावरही निशाणा साधला. कुनिका म्हणाली, "जर ती इतकीच संस्कारी, घाबरलेली आणि हतबल व्यक्ती होती, तर मग ती बिग बॉसमध्ये कशाला आली? काय ती मामाच्या वरातीत आली होती का? बिग बॉस १९ च्या आधी तिला कोणी ओळखतही नव्हतं. या शोमुळे तिला प्रसिद्धी मिळाली आणि आता ती याच शोबद्दल, होस्टबद्दल आणि स्पर्धकांबद्दल वाईट बोलतेय. तिला तिथे टॉर्चर केलं गेलं असं म्हणतेय, मग ती तिथे गेलीच का?"
advertisement
6/7
कुनिकाने तान्याच्या ट्रोलर्सना 'गटरछाप' म्हणत दम भरला आहे. कुनिकाने आरोप केला की, तान्याने घरामध्ये फरहाना, नीलम, अमाल आणि झीशान यांच्यासोबत मिळून माझ्याविरुद्ध अनेक माईंड गेम्स खेळले. "लोकांनी मला याचे पुरावे पाठवले आहेत, पण खेळ म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं," असं कुनिकाने स्पष्ट केलं.
advertisement
7/7
जेव्हा एका युजरने कुनिकाला तिच्या प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला, तेव्हा कुनिकाने उपरोधिकपणे उत्तर दिलं की, "माझ्या तब्येतीची काळजी करू नका, तुमच्या मॅडम तान्या मित्तलची काळजी घ्या. ती स्वतःच म्हणतेय की तिला तिथे जीवे मारण्याची भीती वाटत होती आणि तिची मानसिक स्थिती ठीक नाहीये."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'जर ती इतकीच संस्कारी...', BB19 संपून उलटले 2 महिने, तरी तान्या-कुनिकाचा वाद संपेना, 60 वर्षांच्या अभिनेत्रीने ट्रोलर्सना झोडपलं