तान्या मित्तल खोटारडी! Bigg Boss 19 च्या घरात फुकटात नेसल्या 800 साड्या, एकही पैसा दिला नाही, जवळच्या व्यक्तीने केली पोलखोल
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Tanya Mittal : 'बिग बॉस 19' या सीझनमधील सर्वाधिक चर्चेत असणारी स्पर्धक तान्या मित्तल आता अडचणीत आली आहे. बिग बॉसच्या घरात ज्या साड्या नेसून तान्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं त्या साड्यांचे पैसे तिने डिझायनरला दिले नसल्याचं आता समोर आलं आहे.
advertisement
1/7

'बिग बॉस 19' या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या कार्यक्रमातील एक स्पर्धक तान्या मित्तल (Tanya Mittal) सध्या चर्चेत आहे. तान्याची पर्सनल स्टायलिस्ट रिद्धिमा कपूरने तान्यावर गंभीर आरोप केले आहेत.
advertisement
2/7
'बिग बॉस 19'च्या घरात तान्याने वेगवेगळ्या साड्या नेसून प्रेक्षकांचं आणि चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. पण या साड्यांचे आणि आऊटफिट्सचा एकही रुपया तिने आपली स्टायलिस्ट रिध्दिमा कपूरला दिले नसल्याचं आता समोर आलं आहे.
advertisement
3/7
रिद्धिमाला तान्याकडून पैसे न मिळाल्याने तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपला राग व्यक्त केला आहे. रिद्धिमा म्हणतेय की तान्याची टिम तिला वेडी समजते. रिद्धिमाने तान्याला अनेक साड्या नेसण्यासाठी पाठवल्या. तसेच या साड्यांच्या पोर्टलचा खर्चदेखील तिने केला. पण तरीही रिद्धिमाला तान्याच्या टिमकडून धमक्या देण्यात येत आहेत.
advertisement
4/7
रिद्धिमाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,"मी तान्या मित्तलला नेहमी पाठिंबा दिला आहे. तान्या 'बिग बॉस 19' गाजवत असताना तिचं स्टायलिंग मी करत असल्याचं अनेकांना माहिती आहे. तान्याला मी अनेक महागडे आऊटफिट्स पाठवले होते. एकदा मी तिच्यासाठी एक खास भेटवस्तू आणि पत्रदेखील पाठवलं होतं. पण तिने मला साधं थँक्यूदेखील म्हटलं नाही".
advertisement
5/7
रिद्धिमा म्हणतेय,"गेल्या एका आठवड्यापासून मी तान्याकडून फॉलो-अप घेण्याचा प्रयत्न करत आहे. मी एवढी मेहनत करतेय? मी वेडी आहे का? तान्या आणि तिच्या टीमला मी हात जोडून विनंती करतेय कृपया माझ्या कामाचा मोबदला मला द्या. लवकरात लवकर पैसे पाठवा".
advertisement
6/7
रिद्धिमा पुढे म्हणतेय,"तान्या मित्तल 'बिग बॉस 19'च्या घरात 800 साड्या घेऊन गेली होती. पण आता या साड्यांमुळे मी अडचणीत आले आहे. पण अद्याप तान्या मित्तल आणि तिच्या टीमकडून पैशांबाबत काहीही प्रतिक्रिया आलेली नाही".
advertisement
7/7
'बिग बॉस 19'च्या घरात तान्या मित्तलने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तान्या मित्तल वैयक्तिक आयुष्यात एक स्पिरिच्युअल सोशल मिडिया इन्फ्लूअन्सर आहे. 'बिग बॉस 19' या कार्यक्रमाची ती तिसरी रनर-अप ठरली होती. पण आता तिने साड्यांचे पैसे न दिल्याने नेटऱ्यांकडून तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
तान्या मित्तल खोटारडी! Bigg Boss 19 च्या घरात फुकटात नेसल्या 800 साड्या, एकही पैसा दिला नाही, जवळच्या व्यक्तीने केली पोलखोल