TRENDING:

सिलेंडर घ्या सिलेंडर! Bigg Boss फेम अभिनेता रस्त्यावर विकतोय LPG Gas Cylinder; स्वत:च शेअर केली पोस्ट

Last Updated:
Bigg Boss Fame Actor : बिग बॉस फेम अभिनेता रस्त्यावर सिलेंडर विकताना दिसला आहे, त्याची सोशल मीडिया पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
advertisement
1/7
सिलेंडर घ्या सिलेंडर! Bigg Boss फेम अभिनेता रस्त्यावर विकतोय LPG Gas Cylinder; स्वत:च शेअर केली पोस्ट
अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता भारतातही जाणवू लागला आहे. देशात एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती प्रचंड वाढल्यात. कमर्शियल गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंट्स अडचणीत आले आहेत. काही ठिकाणी व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. लोक ब्लॅकमध्येही सिलेंडर खरेदी करायला तयार आहेत.
advertisement
2/7
अशा परिस्थितीत बिग बॉस फेम अभिनेता रस्त्यावर उतरून गॅस सिलेंडर विकताना दिसला आहे. अभिनेत्याने स्वत:च सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
advertisement
3/7
अभिनेत्या रस्त्यावर गॅस सिलेंडरसोबत स्वत:चा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. रस्त्याच्या कडेला तो सिलेंडरसोबत उभा दिसतो आहे.
advertisement
4/7
पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की, "सध्या बॉलिवूडपेक्षा गॅस विकण्यात जास्त पैसे आहेत त्यामुळे मी गॅस विकायचं ठरवलं", पुढे त्याने तो विकत असलेल्या सिलेंडरची किंमतही सांगितली आहे.
advertisement
5/7
सिलेंडरच्या किमतीचा आकडा पाहून तुम्हाला चक्करच येईल. त्याने एका गॅस टँकची किंमत तब्बल 10 लाख रुपये सांगितली आहे. त्याला दिवसाला मिळणाऱ्या कमाईपेक्षा हे चांगलं असल्याचं तो म्हणाला. एकदम गोल्डमाइन असं शेवटी त्याने म्हटलं आहे.
advertisement
6/7
या अभिनेत्याचं नाव आहे राजीव अदातिया. तो सलमान खानच्या बिग बॉस 15 या रिएलिटी शोमध्ये झळकला होता. तसंच खतरों के खिलाड़ी 12 आणि सेलिब्रिटी मास्टरशेफ यासारख्या कार्यक्रमांतही त्याने सहभाग घेतला होता.
advertisement
7/7
अर्थात राजीवची ही पोस्ट फक्त उपरोधिक आणि मजेशीर आहे. तो काही खरोखर सिलेंडर विकतोय असं नाही. सध्याच्या परिस्थिती पाहता त्याने ही पोस्ट केली आहे. यावर त्याच्या चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींच्याही प्रतिक्रिया आल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सिलेंडर घ्या सिलेंडर! Bigg Boss फेम अभिनेता रस्त्यावर विकतोय LPG Gas Cylinder; स्वत:च शेअर केली पोस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल