TRENDING:

आईची काय चूक? लेकीचा फोन आला म्हणून आणायला गेली, ‘त्याने’ बस थांबवली अन् भयंकर प्रकार

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: बससमोर उभे राहून बस थांबवली. त्यानंतर आई व मुलीला बसमधून खाली उतरवले आणि मुलीला जबरदस्तीने पळवून नेले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेत तिची आई बुलढाणा जिल्ह्यातील धावडा येथे पोहोचली. मात्र मुलीला घेऊन परत येत असताना धावडा फाट्यावर बस अडवून एका तरुणाने आईच्या समोरच मुलीला जबरदस्तीने पुन्हा घेऊन पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली. हा प्रकार 11 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास न्यायनगर परिसरात समोर आला.
आईची काय चूक? लेकीचा फोन आला म्हणून आणायला गेली, ‘त्याने’ बस थांबवली अन् भयंकर प्रकार
आईची काय चूक? लेकीचा फोन आला म्हणून आणायला गेली, ‘त्याने’ बस थांबवली अन् भयंकर प्रकार
advertisement

‎या प्रकरणात आर्यन राजू साबळे (रा. धावडा, ता. जि. बुलढाणा) असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही 17 वर्षे 16 दिवसांची असून तिच्या आईने याबाबत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, 11 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळच्या सुमारास ही मुलगी कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी तिचा मित्र-मैत्रिणी, नातेवाईक तसेच परिसरात शोध घेतला; मात्र ती सापडली नव्हती.

advertisement

पळून जावून लग्न केलं, नवऱ्यानं सोडलं; तिच्यासोबत नको ते घडलं, पण संभाजीनगरात येताच आयुष्य बदललं!

‎सुमारे तीन महिन्यांनंतर, 10 मार्च 2026 रोजी सकाळी मुलीने आईला फोन करून ती बुलढाणा जिल्ह्यातील धावडा येथे असल्याची माहिती दिली. तसेच ती आर्यन राजू साबळे याच्यासोबत असल्याचेही तिने सांगितले. मुलीकडून फोन आल्यानंतर आई तातडीने धावडा येथे गेली. तेथे चौकशी केल्यानंतर मुलगी आर्यन साबळे यांच्या घरी असल्याचे समोर आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आईने मुलीला सोबत घेऊन बसने छत्रपती संभाजीनगरकडे परतण्याचा निर्णय घेतला.

advertisement

बस धावडा फाटा येथे पोहोचताच आर्यन साबळे याने बससमोर उभे राहून बस थांबवली. त्यानंतर त्याने आई व मुलीला बसमधून खाली उतरवले आणि मुलीला जबरदस्तीने पुन्हा आपल्या घरी नेले. काही वेळातच तो त्या मुलीला घेऊन तेथूनही पळून गेला. या प्रकारानंतर घाबरलेल्या आईने तात्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळी दर घसरलेलेच, लिंबू आणि कांद्याला काय मिळाला भाव, एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

दरम्यान, महिलेने पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीच्या आधारे आर्यन राजू साबळे याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत असून अल्पवयीन मुलीचा शोध सुरू आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
आईची काय चूक? लेकीचा फोन आला म्हणून आणायला गेली, ‘त्याने’ बस थांबवली अन् भयंकर प्रकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल