TRENDING:

50 किलो वजन कमी केल्यानंतर अशी दिसतेय अभिनेत्री आरती सोळंकी; वेट लॉससाठी दररोज करायची 'या' गोष्टी

Last Updated:
फू बाई फू, बिग बॉस तसंच अनेक मालिका आणि सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री आरती सोळंकीनं प्रेक्षकांना सुखद धक्का दिला आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात आरतीचं वेट ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळालं आहे. अभिनेत्रीनं वजन कमी करण्यासाठी नेमकं काय काय केलं?
advertisement
1/8
50kg वजन घटवल्यानंतर अशी दिसतेय अभिनेत्री आरती सोळंकी; फोटो व्हायरल
आरती सोलंकीनं तिच्या कॉमेडीच्या कमाल टायमिंगनं प्रेक्षकांची मनं जिंकली. हिच आरती आता नव्या रुपात चाहत्यांना दिसणार आहे. आरतीनं केलेल्या वेट ट्रान्सफॉर्मेशननं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. आरतीनं आतापर्यंत तब्बल 50 किलो वजन कमी केलं आहे.
advertisement
2/8
50kg वजन घटवल्यानंतर अशी दिसतेय अभिनेत्री आरती सोळंकी; फोटो व्हायरल
2021पासून आरतीची वेटलॉस जर्नी सुरू झाली होती. तेव्हा तिचं132 किलो वजन होतं. ते वजन तिनं 119वर आणलं आणि काही कारणांनी त्याला ब्रेक लागला. त्यानंतर एप्रिल 2023पासून आरतीनं पुन्हा तिचा वेटलॉसचा प्रवास सुरू केला. यावेळी वजन 110 किलो इतकं होतं. वजन कमी केल्यानंतर आरतीमध्ये खूप बदल झालेत.
advertisement
3/8
वजन कमी करण्याच्या या प्रवासात आरती कोणतं डाएट करत होती हे सांगताना ती म्हणाली, "मी दिवसातले 7-8 तास चालते. दिवसाला 40 हजार पावलं होतात"
advertisement
4/8
"इतके तास चालल्यानंतर माझे पाय खूप दुखतात. मी रडत रडत झोपते. पण तीरीही मी हे करते. कारण मी आज रडेन, उद्या रडेन पण कधीतरी मी स्वत:ला पाहून हसेन".
advertisement
5/8
डाएटविषयी आरती म्हणाली, "मी सकाळी नाश्ता आणि दुपारी एक भाकरी किंवा चपाती भाजी असं जेवण मी करते. त्यानंतर दिवसभरात भूक लागली तर भेळ किंवा सँडविच मी खाते".
advertisement
6/8
"त्यानंतर रात्री मी जेवत नाही. रात्री झोपताना मी दूध पिते. आता माझं वजन 84 किलो इतकं आहे. मला ते 70 किलोवर आणायचं आहे", असं आरतीनं सांगितलं.
advertisement
7/8
आरती नुकतीच ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमात आली होती. तेव्हा तिचं वेट ट्रान्सफॉर्मेशननं सर्वांचं लक्ष वेधलं. वजन कमी केल्यानंतर आरतीच्या आयुष्यात अनेक बदल घडलेत. ती म्हणाली, "माझ्यात खूप पॉझिटिव्हीटी आली आहे. वाडीतील माणसं माझं कौतुक करतात. आधीचे आणि आताचे फोटो पाहून मला खूप फरक वाटतोय".
advertisement
8/8
आरती पुढे म्हणाली, "मला माझी पर्सनॅलिटी बदलायची आहे. मला माझ्या वजनामुळे खूप ऐकून घ्यावं लागलं आहे. अनेक वेळा नकार पचवावा लागलाय. पण आता मला स्वत:ला पूर्णपणे बदलायचं आहे".
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
50 किलो वजन कमी केल्यानंतर अशी दिसतेय अभिनेत्री आरती सोळंकी; वेट लॉससाठी दररोज करायची 'या' गोष्टी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल