Shiv Thakare Wedding : शिव ठाकरेची सीक्रेट लग्नानंतर पहिली पोस्ट, अखेर सगळं सांगूनच टाकलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Shiv Thakare on Wedding : बिग बॉस फेम शिव ठाकरेनं सीक्रेट लग्न केल्याचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. शिवनं खरंच लग्न केलंय का असा प्रश्न त्याच्या लाखो चाहत्यांना पडला होता. अखेर त्याने पोस्ट शेअर करत खरं काय ते सांगितलं.
advertisement
1/7

बिग बॉस मराठी 2 चा विजेता शिव ठाकरे याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे खळबळ उडाली. शिवने त्याचं लग्न झाल्याचा फोटो पोस्ट केला होता. फोटोमध्ये शिव कपाळी मुंडावळ्या, लग्नाचे पारंपरिक कपडे परिधान करून दिसत होता. पाठमोरी उभी असलेली त्याची नवरी देखील दिसत होती.
advertisement
2/7
शिव ठाकरेने गुपचूप लग्न केल्याच्या चर्चा सुरू झाल्या. फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. तर काहींनी नाराजी व्यक्त केली. काहींना तर शिवने खरंच लग्न केलंय याबाबत शंका होती.
advertisement
3/7
या सगळ्या चर्चांवर आणि लग्नाच्या फोटोवर अखेर शिव ठाकरेनं मौन सोडलं आहे. शिवने सीक्रेट लग्नानंतर पहिली पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून शिवनं अखेर सगळं सत्य सांगून टाकलं.
advertisement
4/7
शिव ठाकरेने शेअर केलेला तो फोटो आणि व्हिडीओ हा त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमधला असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये लग्नाचे सीन शूटिंग सुरू असल्याचं दिसत आहे.
advertisement
5/7
सप्तपतीचा सीन शूट करताना दिसतोय. शिवच्या लग्नाचा जो फोटो व्हायरल झाला होता तो प्रत्यक्ष आयुष्यातील नाही तर फक्त अभिनयाचा भाग होता.
advertisement
6/7
शिवने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने लिहिलंय, "Finally.. First Shoot of 2026". या कॅप्शनमुळे शिवने प्रत्यक्षात लग्न केलेलं नाही हे समोर आलं आहे. शिवच्या चाहत्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
advertisement
7/7
शिव ठाकरेचं नाव याआधी बिग बॉस मराठी 2 मध्येच अभिनेत्री वीणा जगतापसोबत जोडलं गेलं होतं. दोघे डेट करत होते. पण अचानक त्यांचं ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली. वीणाने शिवच्या नावाचा काढलेला टॅटू देखील पुसला होता. दोघांच्या ब्रेकअपमुळे चाहत्यांना प्रचंड वाईट वाटलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shiv Thakare Wedding : शिव ठाकरेची सीक्रेट लग्नानंतर पहिली पोस्ट, अखेर सगळं सांगूनच टाकलं