TRENDING:

Bigg Boss Marathi 6 च्या घरात पुन्हा चोरी; आता काय गेलं चोरीला, चोर कोण?

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Chori : बिग बॉस मराठी 6 च्या घरात पुन्हा चोरी झाल्याचं पाहायला मिळतं आहे. चोरीचं सामान सापडल्याचं प्रोमोत दाखवण्यात आलं आहे आणि चोरालाही पकडलं आहे, पण खरंच तोच चोर आहे का?
advertisement
1/5
'बिग बॉस मराठी 6' च्या घरात पुन्हा चोरी; आता काय गेलं चोरीला, चोर कोण?
बिग बॉस मराठी 6 च्या घरातील चोरीचं सत्र काही थांबत नाही आहे. सहाव्या सीझनमध्ये काही ना काही चोरीला जातंच आहे. आता बिग बॉसचा चौथा आठवडा सुरू झाला आहे आणि चौथ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच घरात चोरी झाली आहे. बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात चोरी झाल्याचं समजतं.
advertisement
2/5
बिग बॉस मराठी 6 च्या घरात पहिल्या आठवड्यात चावी चोरीला गेली. सोनाली राऊतची चावी. सुरुवातीला चावी चोरीला गेल्याचा आळ सागर कारंडे, सचिन कुमावत आणि आयुष संजीववर आला. तिघांनीही आरोप मनावर घेतला आणि तो खोटा असल्याचं सिद्ध करण्यासाठी न जेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे घरातील संपूर्ण वातावरण बिघडलं. नंतर अनुश्री मानेने चोरल्याचं नंतर समोर आलं. तो तिचा गेम होता असं तिनं सगळ्यांना सांगितलं.
advertisement
3/5
चावी प्रकरण सुरू असताना घरात विविध कारणांवरून भांडणं सुरू होती. अशातच तिसऱ्या आठवडा सुरू झाला नव्हता तोच बिग बॉसने दिलेल्या राशनमधील सदस्यांची अंडी गायब झाली. ही अंडी टोळीच्या सदस्यांनीच चोरल्याचं कबूल देखील केलं. आधी चावी अनुश्रीने चोरल्याचं कबूल केलं त्यानंतर अंडीदेखील अनुश्रीनेच मस्करीमध्ये चोरली आणि ती परत दिली. पण अनुश्री ऐवजी तिच्या चोरीची जबाबदारी विशालने घेतली.
advertisement
4/5
अंडी चोरण्याचा राडा सुरू असताना नंतरच्या भागात विशालचा बॉडीवॉश चोरीला गेल्याचं दिसलं. तो त्याला त्यावेळचा कॅप्टन आयुषच्या रूममध्ये सापडतो असं दाखवण्यात आलं आहे. आता चौथा आठवड्यातही चोरी झाली आहे. नव्या एपिसोडच्या प्रोमोत चोरीला गेलेलं विशाल आणि रोशनला चोरी झालेलं सामान सापडल्याचं दाखवण्यात आलं आहे. यात चॉकलेट, तांदूळ अशा वस्तूंचा समावेश आहे.
advertisement
5/5
यावेळी चोरीचा आरोप लावण्यात आला तो तन्वीवर. कारण हे सामान तिच्या बेडजवळ सापडतं. तन्वी आपल्यावरील चोरीचा आरोप नाकारते पण कोणी तिच्यावर विश्वास ठेवत नाही आणि ती आपण घर सोडणार असल्याचा निर्णय घेते. तर प्रेक्षकांनी अनुश्रीच चोर असल्याचं म्हटलं आहे. आता खरा चोर कोण हे एपिसोडमध्येच समजेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 च्या घरात पुन्हा चोरी; आता काय गेलं चोरीला, चोर कोण?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल