तिघांवर टांगती तलवार! पण वेगळाच सदस्य Bigg Boss Marathi 6 च्या घरातून 'आऊट'? एव्हिक्शनआधीच समजलं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 मध्ये सहाव्या आठवड्यातील नॉमिनेशन आणि वोटिंग पार पडलं आहे. घरातील एक सदस्य घरातून बाहेर जाणार आहे, एव्हिक्शनआधीच त्याच्या नावाची चर्चा होते आहे.
advertisement
1/5

वीकेंड आला की बिग बॉस मराठी 6 च्या घरातून कोणता सदस्य घरातून बाहेर पडणार याचं टेन्शन म्हणा किंवा उत्सुकता सगळ्या प्रेक्षकांना असते. घरातील सदस्य एकमेकांना नॉमिनेट करतात. आणि नंतर प्रेक्षक वोट करतात. त्यावर घरात कोण राहणार आणि कोण जाणार याचा अंदाज बांधला जातो.
advertisement
2/5
सोशल मीडियावर फिरणारे ट्रेंड्स आणि विविध चाहत्यांच्या सर्वेक्षणांनुसार या आठवड्याच्या वोटिंग लिस्टमध्ये रोशन भजनकर मतदानाच्या शर्यतीत आघाडीवर आहे, त्याच्या मागे राकेश बापट आहे. या दोघांना सर्वाधिक वोट आहेत. त्यानंतर मध्यभागी अनुक्रमे सचिन कुमावत, प्रभू शेळके, अनुश्री माने आणि रुचिता जमादार यांचा क्रमांक आहे.
advertisement
3/5
तर शेवटी प्राजक्ता शुक्रे, सागर कारंडे आणि दीपाली सय्यद यांची नावं आहेत त्यांना सगळ्यात कमी वोट आहे. त्यामुळे या तिघांवर टांगती तलवार आहे. पण तिघांऐवजी घरातील वेगळाच सदस्य आऊट होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होते आहे.
advertisement
4/5
हा सदस्य आहे सचिन कुमावत. भाऊचा धक्काच्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख सचिनला झापताना दिसतो आहे. राखीवर पीठ आणि पाणी फेकल्याचा जाब त्याने त्याला विचारला. यानंतर सचिनच घरातून बाहेर पडणार आहे, अशी चर्चा होते आहे. आता नेमकं कोण जाणार हे एव्हिक्शनच्या दिवशीच समजेल.
advertisement
5/5
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये एकूण 17 स्पर्धक होते. त्यापैकी राधा पाटील, सोनाली राऊत, दिव्या शिंदे, ओंकार राऊत, आयुष संजीव आणि करण सोनवणे हे 6 सदस्य शोमधून बाहेर पडले आहेत. आता घरात राकेश बापट, सागर कारंडे, विशाल कोटियन, प्राजक्ता शुक्रे, राखी सावंत, प्रभु शेळके, दीपाली सय्यद, अनुश्री माने, रुचिता जामदार, सचिन कुमावत, तन्वी कोलते हे 11 सदस्य आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
तिघांवर टांगती तलवार! पण वेगळाच सदस्य Bigg Boss Marathi 6 च्या घरातून 'आऊट'? एव्हिक्शनआधीच समजलं