3 वर्ष लिव्ह इनमध्ये, रोज हाताने भरवते जेवण; BBM6च्या घरात राधा पाटिलच्या प्रेमाची कबूली, कोण आहे तिचा बॉयफ्रेंड?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Radha Patil Confess her Love : डान्सर राधा पाटिलने बिग बॉसच्या घरात तिच्या प्रेमाची कबूली दिली आहे. राधा रिलेशनमध्ये असून ती लिव्हइनमध्ये राहतेय. कोण आहे तिचा बॉयफ्रेंड?
advertisement
1/9

डान्सर राधा पाटील सध्या बिग बॉस मराठी 6 मुळे चांगलीच चर्चेत आहे. घरात प्रवेश केल्यानंतर राधा थोडी शांत दिसली. पण हळू हळू तिने तिचा खेळ खेळायला सुरुवात केली आहे. तिचा स्पष्ट आणि बिनधास्त स्वभाव बिग बॉसच्या घरात पाहायला मिळतोय.
advertisement
2/9
राधा पाटिल ही आतापर्यंत तिच्या आणि गौतमी पाटिलसोबतच्या कॉन्ट्रोवर्सीमुळे चर्चेत आली होती. ती डान्सर म्हणून फेमस आहे. मात्र बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्यांदाच राधा पाटिलची लव्ह लाइफ समोर आली आहे. राधाने पहिल्यांदाच संपूर्ण महाराष्ट्रासमोर तिच्या लव्ह लाइफची कबुली दिली.
advertisement
3/9
बिग बॉसच्या घरात गप्पांच्या ओघात राधाने तिच्या बॉयफ्रेंडबद्दल मनमोकळेपणाने सांगितलं. राधा गेली 3 वर्ष बॉयफ्रेंडबरोबर लिव्हइनमध्ये राहतेय. अनुश्रीशी बोलताना राधा म्हणाली, आमचा 2 बीएचके आहे. आमचा बेडरुम वेगळा आहे. आम्ही लिव्ह-इनमध्ये राहतो."
advertisement
4/9
राधा पुढे म्हणाली, "तो असा आहे की, मला कोणी काही बोललं तर तो समोरच्याला फाडून टाकेल. तो इथे असता तर सगळ्यांना मारून निघून गेला असता."
advertisement
5/9
राधा पुढे म्हणाली, "तो असा आहे की, मला कोणी काही बोललं तर तो समोरच्याला फाडून टाकेल. तो इथे असता तर सगळ्यांना मारून निघून गेला असता. त्याला कुठलंही व्यसन नाही. गेल्या तीन वर्षांत त्याने स्वतःच्या हाताने कधी जेवण केलं नाही, माझ्याच हाताने जेवतो."
advertisement
6/9
राधा आणि तिच्या बॉयफ्रेंडचा एकमेकांवर प्रचंड जीव आहे. राधाने सांगितलं, "मला कधी कधी वाटतं, काय होत असेल त्याचं. मुलींना जसा देसी बॉय हवा असतो, तो अगदी तसाच आहे. माझी चिडचिड, ओरडणं सहन करतो. मी चिडली की बाहेर जाऊन बसतो. थोड्या वेळाने येतो, विचारतो झाली का शांत"
advertisement
7/9
अनुश्री मानेनेही राधाच्या बॉयफ्रेंडला ओळखते. अनुश्री म्हणाली, मी त्याची फॅन आहे. त्याचं गाणं तिला खूप आवडतं. अनुश्रीने ज्या गाण्याचं नाव सांगितलं ते एपिसोडमध्ये बिप करण्यात आलं.
advertisement
8/9
राधा पुढे म्हणाली की, "त्याच्यासाठी खूप जण वेडे आहेत. फिरायला जातो तेव्हा सगळे त्याच्याबरोबर फोटो काढतात. पण फोटो काढतानाही तो कधीच माझा हात सोडत नाही. तीन वर्ष झाली प्रेम कमी झालं नाही. त्याची आठवण आली की मला खूप रडायला येतं."
advertisement
9/9
राधा आणि अनुश्रीच्या बोलण्यातून असं समोर आलं की, राधा पाटिलचा बॉयफ्रेंड हा लोकप्रिय गायक आहे. आता तो कोण आहे हे मात्र समोर आलेलं नाही. राधा पाटिलच्या बॉयफ्रेंडबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
3 वर्ष लिव्ह इनमध्ये, रोज हाताने भरवते जेवण; BBM6च्या घरात राधा पाटिलच्या प्रेमाची कबूली, कोण आहे तिचा बॉयफ्रेंड?