Bigg Boss Marathi 6 : एकीकडे विशालवर प्रेम, दुसरीकडे राकेशसोबत 'गुटर गूं'; 'बिग बॉस'च्या घरात रुचिताचं चाललंय काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 च्या घरात जे होईल असं वाटलं नव्हतं तेच होतं आहे. रुचिता जामदार आणि राकेश बापट एकत्र आले आहेत. विशालही त्यांच्याकडे पाहत राहिला.
advertisement
1/7

बिग बॉसच्या घरात भांडण, वादासह काही जोड्याही जुळल्या गेल्या. त्यापैकीच एक म्हणजे रुचिता जामदार आणि विशाल कोटियन. रुचिताने अनुश्रीशी बोलताना विशालबाबत तिच्या भावना व्यक्त केल्या. तेव्हा ती रडलीसुद्धा. तर यानंतर विशालनेही आपल्या रुचिता आवडत असल्याचं सांगितलं होतं.
advertisement
2/7
या दोघांमध्ये नातं फुलतंय की असं वाटत असताना आता रुचिता पलटलेली दिसते आहे. विशालला डिच्चू देत राकेश बापटसोबत दिसली आहे. रुचिता आणि राकेश आजवर एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळालेत. त्यांच्यातील भांडणंही अगदी टोकाला गेली होती. पण आता मात्र एकमेकांचे हे कट्टर शत्रू एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत.
advertisement
3/7
राकेश आणि रुचिता दोघं एकत्र बसून शांतपणे एकमेकांशी बोलत आहेत. राकेश रुचिताला म्हणतो तू स्ट्राँग आहेस, मी स्ट्राँग आहे. आपण दोन स्ट्राँग काय करू त्याच्यामध्ये, काय ट्विस्ट आणू शकतो. गेम पलटेल माहिती आहे.
advertisement
4/7
यावर रुचिता म्हणते, "खूप बेकार आहे. कारण तेच तेच झालंय". राकेश म्हणतो, "मला पण तेच वाटतं आता मजा नाही राहिली". रुचिताही "टीम टीम ग्रुप्स" असं म्हणते.
advertisement
5/7
यानंतर राकेश रुचिताला सांगतो की, "आपले आतले डायनामिक्स आहेत ना ते तू आणि मी फक्त. बाकी कुठेही डिसक्स करू नकोस. यावर रुचिताही राकेशला म्हणते की, असं असेल ना, तर मला हवं आहे की ते आपल्या दोघांमध्येच राहावं"
advertisement
6/7
राकेश आणि रुचिता बोलत असताना विशालही तिथंच त्यांच्यासमोर बसला आहे. तो त्यांच्याकडे एकटक पाहतो आहे. हे राकेश पाहतो आणि तो रुचिताला म्हणतो, आता आपण बोलतोय ना तर बघ सगळ्यांचे डोळे चमकताहेत.
advertisement
7/7
आता राकेश आणि रुचिता यांची ही जोडी घरात काय नवीन ड्रामा, ट्विस्ट आणणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला राकेश आणि रुचिता यांचं एकत्र येणं आवडलं आहे का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : एकीकडे विशालवर प्रेम, दुसरीकडे राकेशसोबत 'गुटर गूं'; 'बिग बॉस'च्या घरात रुचिताचं चाललंय काय?