TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : अखेर 50 दिवसांनी सागरने आपला खरा चेहरा दाखवलाच! प्रेक्षकही थक्क; म्हणाले, 'असा सागर...'

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Sagar Karande : सागर कारंडेबाबत तो दाखवतो एक आणि आहे वेगळाच, असं मत बिग बॉस मराठी 6 च्या घरातील सदस्यांनी कितीतरी वेळा मांडलं आहे, कित्येत प्रेक्षकांनीही तेच म्हटलं आहे. अखेर तब्बल 50 दिवसांनी सागरने आपला खरा चेहरा दाखवून दिला आहे.
advertisement
1/7
असा सागर...! अखेर 50 दिवसानी सागरने आपला खरा चेहरा दाखवलाच; प्रेक्षकही थक्क
बिग बॉस मराठी 6 च्या घरात काही सदस्य जास्तच दिसतात तर काही दिसतच नाहीत. काही सदस्य आपलं मत थेटपणे मांडतात तर काही बिलकुल मांडतच नाहीत. अशा सदस्यांमध्ये नाव होतं ते सागर कारांडेचं.
advertisement
2/7
कॉमेडी शोमध्ये लोकांना खळखळवून हसवणारा सागर कारंडे गेममध्ये दिसत नाही, तो आपली मतं मांडत नाही, म्हणून त्याला प्रेक्षकांनी ट्रोल केलं.
advertisement
3/7
तसंच सागरचा दाखवतो तो आणि त्याचा खरा चेहरा वेगळाच आहे, असं बिग बॉसच्या घरातील सदस्य आणि प्रेक्षकांनी म्हटलं होतं.<span style="font-size: 20px;"> </span>
advertisement
4/7
बिग बॉसच्या घरात आता 50 दिवस उलटून गेले आहेत. अखेर 50 दिवसांनी सागरने आपलं खरं रूप सगळ्यांना दाखवून दिलं आहे.
advertisement
5/7
कॅप्टन्सीपदाच्या उमेदवारीवेळी सागरने आपलं स्पष्ट आणि थेट मत मांडलं आहे. घरातील कोणताच सदस्य विशालला कॅप्टन्सीपद द्यायला तयार होत नाही. यावेळी विशाल भडकतो.
advertisement
6/7
विशाल भडल्यानंतर सागरही त्यावर व्यक्त होतो. सागर विशालला म्हणतो. त्यांच्याकडे चावी होती, ते कॅप्टन होण्याचे चान्सेस त्यांना होते. मग तू चावी का चोरली. असं विचारताना दिसतो. विशालने वाइल्ड कार्ड सदस्यांची चावी चोरल्याने सागरने त्याला जाब विचारला.
advertisement
7/7
बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा हा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. त्यावर बऱ्याच कमेंट आल्या आहेत. बहुतेकांनी सागरने घेतलेल्या या स्टँडचं कौतुक केलं आहे. सागर दादा बरोबर बोलला, आता सागरचा गेम दिसू लागला, आता सागर दिसू लागला, 50 दिवसात सागर पहिल्यांदा खरा बोललं, अशा प्रतिक्रिया नेटिझन्सच्या येत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : अखेर 50 दिवसांनी सागरने आपला खरा चेहरा दाखवलाच! प्रेक्षकही थक्क; म्हणाले, 'असा सागर...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल