TRENDING:

Prabhu Shelke : 'इथे मी चाळे करायला नाही आलो', काळू डॉनसोबत कोणी केलं फ्लर्टिंग? प्रभूनं एका वाक्यात संपवला विषय

Last Updated:
Kalu Son Prabhu Shelke : Bigg Boss Marathi 6 च्या घरात काळू डॉनची कोणी फिरकी घेतली? त्याने कडक शब्दांतच विषय संपवला.
advertisement
1/8
'इथे मी चाळे करायला नाही आलो', काळू डॉनसोबत कोणी केलं फ्लर्टिंग?
बिग बॉस मराठी 6 मध्ये सगभागी झालेले स्पर्धक हळू हळू घरात रूळू लागले आहेत. सगळ्यांची एकमेकांशी मैत्री होत आहे. सगळे आपापला कम्फर्ट झोन शोधत आहेत. अनेकांना त्यांचा कम्फर्ट झोन असलेला माणूसही सापडला आहे. 
advertisement
2/8
बिग बॉस मराठीच्या घरात मज्जा मस्ती आलीच. कधी झालं तर फ्लर्टिंग देखील होते. यावरून मग घरात चांगलाच रंगतदार माहोल पाहायला मिळतो आहे. नुकत्याच झालेल्या एका टास्कनंतर घरातल्यांनी काळू डॉन प्रभू शेळकेची मिळून फिरकी घेतली.
advertisement
3/8
प्रभूला मुद्दाम अशा प्रश्नांमध्ये अडकवण्यात आलं ज्यामुळे घरात एकच हशा पिकला. काळू डॉनसोबत थोडं फ्लर्टिंगच झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण या सगळ्याला त्याने एका वाक्यात असं काही उत्तर दिलं की सगळे शांत झाले.
advertisement
4/8
सागर प्रभूला विचारतो, "आपल्या मैत्रीची आण आहे, सांग आवडते की नाही?" यावर प्रभू सुरुवातीला टाळाटाळ करत म्हणतो, "मला इथे सगळेच आवडतात."
advertisement
5/8
सागर हट्ट धरतो आणि म्हणतो, "हो की नाही", प्रभू म्हणतो, नाही. यानंतर घरातील इतर सदस्यही मुद्दाम "मला आवडते" असं म्हणायला लागतात. दबावात येऊन प्रभूही "हो, मलाही आवडते" असं म्हणतो.
advertisement
6/8
यानंतर तन्वी थेट मुद्द्यावर येत म्हणते, "प्रभू जी तुझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे ती तुला आवडते, मग 5 वर्षांनी मोठी असेल तर तुला काय फरक पडतो? मी नाही आवडत तुला?" त्यावेळी सागर तन्वीला म्हणतो, "नाही नाही, तू जबरदस्ती केलीस त्याला ताई म्हणायला. तो तयार नव्हता."
advertisement
7/8
सगळे मिळून प्रभूची फिरकी घेत असताना अखेर प्रभू एक वाक्य बोलतो आणि सगळ्यांना गप्प करतो. तो ठामपणे म्हणतो, "आता माझं ऐका, इथे मी चाळे करायला नाही आलो. बिग बॉसमध्ये गेम खेळायला आलो आहे." प्रभूच्या या उत्तरानंतर घरात क्षणभर शांतता पसरते.
advertisement
8/8
या संपूर्ण प्रकारात सागर कारंडे आणि इतर घरातील सदस्यांनी प्रभूवर मजेशीर प्रँक केला. पण प्रभूने एका वाक्यात आपली भूमिका स्पष्ट करत विषय संपवला. प्रभूचं संपूर्ण लक्ष हे गेमवर आहे हे देखील त्याने दाखवून दिलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prabhu Shelke : 'इथे मी चाळे करायला नाही आलो', काळू डॉनसोबत कोणी केलं फ्लर्टिंग? प्रभूनं एका वाक्यात संपवला विषय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल