TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : 12 आठवडे जीव तोडून खेळला; एका चुकीमुळे सगळं गमावलं; ढसाढसा रडला हा सदस्य

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 च्या घरात एकिकडे तन्वी सीझनची पहिली फायनलिस्ट ठरली आहे, तर दुसरीकडे एक सदस्य सगळं गमावून बसला आहे.
advertisement
1/9
BBM6 : 12 आठवडे जीव तोडून खेळला; एका चुकीमुळे सगळं गमावलं; ढसाढसा रडला हा सदस्य
बिग बॉस मराठीचा सहावा सीझन अंतिम टप्प्यात आला असून सीझनची पहिली फायनलिस्ट तन्वी कोलते ठरली आहे. तिकीट टू फिनालेसाठी झालेल्या टास्कमध्ये तन्वीने बाजी मारली आणि ती फायनलमध्ये गेली आहे. एकीकडे तन्वीने फायनलमध्ये धडक मारली असताना दुसरीकडे दुसऱ्या सदस्याने मात्र  सगळं गमावलं आहे.
advertisement
2/9
बिग बॉस मराठी 6 च्या घरातील एक स्पर्धक एका चुकीमुळे सगळं गमावून बसला आहे. त्याचा आता त्याला पश्चाताप होतो आहे आणि तो ढसाढसा रडला आहे.
advertisement
3/9
हा स्पर्धक दुसरा तिसरा कोणी नाही तर विशाल कोटियन आहे. ज्याने राकेश बापटशी वाद घालत राडा केला. याची शिक्षा त्याला बिग बॉसने दिली. विशालला संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे.
advertisement
4/9
विशाल आता पस्तावतो आहे. स्विमिंग पूलजवळ बसून तो एकटाच रडताना दिसला. तो बोलतो, "12 आठवडे जीव तोडून खेळलो, एका चुकीमुळे सगळं घालवलं. या घरात काहीच करू शकत नाही. मला एकएक टोळीवाल्यांसाठी, बाबांसाठी खेळायचं आहे, आईसाठी जिंकायचं आहे पण कसं माहिती नाही"
advertisement
5/9
नॉमिनेशनच्या टास्कमध्ये राकेशने विशाल आपल्या आणि इतरांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलतो असं म्हणत विशालला नॉमिनेट केलं. या रागात विशालने आरबीच्या घटस्फोटाचा मुद्दा उकरून काढला. यामुळे आरबीही भडकला. सुरुवातीला दोघांमध्ये बाचाबाची नंतर हाणामारी झाली.
advertisement
6/9
बिग बॉसने राकेशला एका आठवड्यासाठी आणि विशालला संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट केलं. दरम्यान राकेशच्या कुटुंबाने प्रसिद्धी पत्रक जारी करत विशालला कडक शिक्षा सुनावण्याची मागणी केली. सोशल मीडियावरही विशालविरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या.
advertisement
7/9
भाऊचा धक्कावर रितेशनेही विशालला कडक शब्दात सुनावलं. रितेश म्हणाला, "विशाल तुम्ही राकेश यांना धक्का नाही मारलात तुम्ही जी जिंकण्याची ट्रॉफी आहे तिला धक्का मारलात. तुम्हाला थेट सांगतो महाराष्ट्राला हे आवडलेलं नाही. हे खपवून घेतलं जाणार नाही"
advertisement
8/9
दरम्यान बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनच्या ग्रँड फिनालेसाठी अवघे काही दिवसच उरले आहेत. 19 एप्रिलला महाअंतिम सोहळा होणार आहे.
advertisement
9/9
टॉप 5 मध्ये गेलेली पहिली स्पर्ध तन्वी आहे. आता राकेश, रेवा, अनुश्री, राखी, विशाल, दिपाली यांच्यापैकी टॉप 5 मध्ये कोण जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : 12 आठवडे जीव तोडून खेळला; एका चुकीमुळे सगळं गमावलं; ढसाढसा रडला हा सदस्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल