Rashmika-Vijay Reception: कुर्गमध्ये विजय-रश्मिकाचं दुसरं ग्रँड रिसेप्शन, सासऱ्याने जावयाला दिलं कोट्यवधींच सरप्राइज! ऐकून गार व्हाल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Rashmika-Vijay Grand Reception: २६ फेब्रुवारीला राजस्थानच्या उदयपूर येथे लग्नगाठ बांधल्यानंतर आता जवळपास महिन्याभराने या जोडप्याने रश्मिकाचं होमटाऊन कूर्गमध्ये एक ग्रँड रिसेप्शन दिलं.
advertisement
1/6

फक्त साऊथच नाही, तर संपूर्ण देशात हिट असलेलं कपल म्हणजेच अभिनेता विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना यांच्या लग्नाचा फिव्हर काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. त्यांच्या लग्नातील अनसीन फोटो सोशल मीडियावर अक्षरशः आग लावत आहेत.
advertisement
2/6
२६ फेब्रुवारीला राजस्थानच्या उदयपूर येथे लग्नगाठ बांधल्यानंतर आता जवळपास महिन्याभराने या जोडप्याने रश्मिकाचं होमटाऊन कूर्गमध्ये एक ग्रँड रिसेप्शन दिलं. या सोहळ्यात केवळ रश्मिकाच्या सौंदर्याचीच नाही, तर तिच्या वडिलांनी दिलेल्या एका आलिशान भेटीचीही जोरदार चर्चा रंगली आहे.
advertisement
3/6
६ एप्रिल रोजी विराजपेटच्या सेरेनिटी हॉलमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यासाठी या कपलने अतिशय हटके पण तितकाच पारंपारिक पेहराव केला होता. यावेळी रश्मिका अस्सल कूर्गी अंदाजात सजली होती. तिने मेहंदी आणि गडद गुलाबी रंगाची कांजिवरम सिल्क साडी नेसली होती. विशेष म्हणजे, तिने ही साडी खास कोडवा स्टाईलने म्हणजेच कूर्गच्या परंपरेनुसार ड्रेप केली होती.
advertisement
4/6
दुसरीकडे, विजय देवरकोंडाने पांढरा शर्ट, ब्लॅक ट्रउझर आणि चंदेरी नक्षीकाम असलेला ब्लेझर परिधान करून रेट्रो स्टाईल लूक कॅरी केला होता. यावेळी स्टेजवर रश्मिका लाडात येऊन विजयचे केस नीट करताना दिसली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
advertisement
5/6
या रिसेप्शनमधील सर्वात मोठी आकर्षण ठरलं ते म्हणजे रश्मिकाच्या वडिलांनी आपल्या लेकीला दिलेलं अनोखं गिफ्ट. सूत्रांच्या माहितीनुसार, रश्मिकाच्या वडिलांनी रश्मिकाला लग्नाची भेट म्हणून कूर्गमध्येच एक अतिशय महागडा आणि आलिशान बंगला भेट दिला आहे. या बंगल्याची किंमत करोडोंच्या घरात असून, आपल्या लेकीचं कौतुक करण्यासाठी वडिलांनी दिलेली ही भेट पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
advertisement
6/6
या सोहळ्यात विजयने माईक हातात घेताच उपस्थित पाहुण्यांची मनं जिंकली. तो गंमतीने म्हणाला, "कूर्गच्या मुली खरोखरच खूप सुंदर असतात आणि मी खूप नशीबवान आहे की माझं लग्न इथल्याच एका सुंदर मुलीशी झालंय." विजयच्या या विधानावर रश्मिका लाजेने लाल झाली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rashmika-Vijay Reception: कुर्गमध्ये विजय-रश्मिकाचं दुसरं ग्रँड रिसेप्शन, सासऱ्याने जावयाला दिलं कोट्यवधींच सरप्राइज! ऐकून गार व्हाल