TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : तुला दाखवतो! पहिल्याच दिवशी झोप उडवली; संस्कृतीच्या अ‍ॅक्शनवर विशालची हार्डकोर रिअ‍ॅक्शन

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Sanskruti Vishal Fight : वाइल्ड कार्डने बिग बॉस मराठी 6 च्या घरात येताच पहिल्याच दिवशी संस्कृतीने विशालची झोप उडवली आहे. ज्यामुळे विशालही चांगलाच भडकला आहे.
advertisement
1/7
BBM 6 : तुला दाखवतो! संस्कृतीच्या अ‍ॅक्शनवर विशालची हार्डकोर रिअ‍ॅक्शन
बिग बॉस मराठी 6 मध्ये 3 वाइल्ड कार्ड एंट्री झाल्यात. घरात तीन नव्या सदस्यांची एंट्री झाल्यावर घरात आता काय नवीन ड्रामा  याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. घरात येताच नव्या सदस्यांनी अक्षरश: राडा घातला आहे. रेवाने रुचिताशी पंगा घेतला तर संस्कृतीने विशालशी. घरात पहिल्याच दिवशी संस्कृतीने विशालची झोप उडवली आहे. ज्यामुळे विशालही चांगलाच भडकला आहे.
advertisement
2/7
बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता विशाल बेडवर झोपला आणि संस्कृती त्याला उठवताना दिसते. विशाल विशाल अशी हाक मारत, तुला झोपूच देणार नाही, चावी मला पाहिजे, असं सांगते. ती बेड हलवते, त्याच्या कानाजवळ खलबत्ता वाजवते, त्याचे पाय हलवते.
advertisement
3/7
विशालला संस्कृतीने हात लावताच तो तिच्यावर भडकतो. मला हात लावू शकत नाही, असं तो तिला सांगतो. त्यावर संस्कृती ओके असं म्हणते आणि ती पाणी घेऊन येते आणि झोपलेल्या विशालवर टाकते. संस्कृतीने अंगावर पाणी टाकताच विशाल आणखी चवताळतो तो उठतो आणि पाणी का टाकलं, तुला दाखवतो असं म्हणतो.
advertisement
4/7
पुढे विशाल पाण्याची बाटली घेतो आणि बाटलीतील सगळं पाणी संस्कृतीच्या डोक्यावर ओततो. चलो चलो उठो असं म्हणत तो तिथून निघून जातो. संस्कृती तिथं तशीच उभी राहते.
advertisement
5/7
संस्कृतीच्या अ‍ॅक्शनवर विशालची हार्डकोर रिअ‍ॅक्शन पाहायला मिळाली. आता संस्कृती पुढे काय करणार हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
advertisement
6/7
बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्डने एंटर झालेल्या तिन्ही सदस्यांना पॉवर की आणि थेट कॅप्टन्सीपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. तसंच बिग बॉसच्या घराचं रुपांतर बीबी हॉटेलमध्ये करण्यात आलं आहे.
advertisement
7/7
बीबी हॉटेलमध्ये नवीन सदस्य हॉटेलचे व्हीव्हीआयपी गेस्ट आणि घरातील सदस्यांपैकी दोघांना पहारेकरी आणि दोघांना सेवक बनवण्यात आलं आहे. पहारेकरी म्हणून रुचिता आणि सागर तर सेवक म्हणून विशाल आणि तन्वी यांची नव्या सदस्यांनी निवड केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : तुला दाखवतो! पहिल्याच दिवशी झोप उडवली; संस्कृतीच्या अ‍ॅक्शनवर विशालची हार्डकोर रिअ‍ॅक्शन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल