TRENDING:

'बिग बॉस मराठी'ची पहिली विनर मेघा धाडे कुठे आहे? आता करतेय हे काम

Last Updated:
Megha Dhade : 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे सध्या कुठे आहे? काय करते? जाणून घ्या.
advertisement
1/7
'बिग बॉस मराठी'ची पहिली विनर मेघा धाडे कुठे आहे? आता करतेय हे काम
'बिग बॉस मराठी'चा पहिला सीझन 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या पर्वातील सर्वच स्पर्धकांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. पण आपल्या विशेष स्टाईलसाठी ओळखली गेली ती अभिनेत्री मेघा धाडे.
advertisement
2/7
'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत मेघा धाडे चर्चेत राहिली. विशेष म्हणजे मेघा धाडेच या पहिल्या-वहिल्या 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली होती.
advertisement
3/7
'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरलेल्या मेघा धाडेला चमकत्या ट्रॉफीसह 50 लाख रुपयांचं बक्षीसदेखील मिळालं होतं. 'बिग बॉस मराठी' जिंकल्यानंतर मेघा धाडे सलमानच्या 'बिग बॉस 12'मध्ये सहभागी झाली होती. पण त्यावेळी ती लवकर एलिमिनेट झाली.
advertisement
4/7
'बिग बॉस'नंतर मेघा धाडेने इंडस्ट्रीपासून दूर राहणं पसंत केलं. तिने स्वत:चा एक पर्सचा ब्रँड सुरू केला. तसेच स्वत:चं एक युट्यूब चॅनलही सुरू केलं. व्लॉगर म्हणून ती चाहत्यांच्या भेटीला आली.
advertisement
5/7
मेघा धाडे 'बिग बॉस मराठी'नंतर तब्बल सहा वर्षांनी 'सावल्याची जणू सावली' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत तिने साकारलेली खलनायिकेची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
advertisement
6/7
मेघा धाडे राजकारणातही सक्रीय आहे. आपल्या बिंधास्तपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या मेघाने 2023 मध्ये भाजपात प्रवेश केला आहे.
advertisement
7/7
मेघा धाडेने आजवर 'कसौटी जिंदगी कै','पेहचान','कस्तुरी','झुंज मराठमोळी','अस्सल पाहुणे इरसाल नमुणे','एकदम कडक' अशा अनेक मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'बिग बॉस मराठी'ची पहिली विनर मेघा धाडे कुठे आहे? आता करतेय हे काम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल