TRENDING:

अजब प्रकरण! बाथरूमला गेला इंजिनीअर, बॉसने कर्मचाऱ्याला नोकरीवरूनच काढून टाकलं

Last Updated:
Boss Fired Employee For Long Bathroom Breaks : काम सुरू असताना सतत बाथरूमला जाणं एका इंजिनीअरला महागात पडलं. कंपनीने त्याला नोकरीवरून काढलं. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. न्यायालयाने असा निर्णय दिला की...
advertisement
1/7
अजब प्रकरण! बाथरूमला गेला इंजिनीअर, बॉसने कर्मचाऱ्याला नोकरीवरूनच काढून टाकलं
लघवी किंवा शौचाला होणं ही शरीराची नैसर्गिक क्रिया. ज्याला कुणी रोखू शकत नाही. त्यामुळे रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, हॉटेल्स, ऑफिसेस अशा सार्वजनिक ठिकाणीही बाथरूम असतात. कर्मचारी ऑफिसमध्ये बाथरूममध्ये ब्रेक घेतात. यावर कोणतीही बंधनं नाहीत. असं असताना एका कंपनीत मात्र एका कर्मचाऱ्याला तोसुद्धा इंजिनीअर, त्याला त्याच्या बॉसने बाथरूमला गेला म्हणून नोकरीवरून कायमचं काढून टारलं आहे.
advertisement
2/7
चीनमधील ही घटना सोशल मीडियावर चर्चेत आहे. ली नावाचा हा इंजिनीअर 2010 पासून जियांग्सू प्रांतातील एका कंपनीत काम करतो. 2014 साली लीचं ओपन टर्म काँट्रॅक्ट रिन्यू करण्यात आलं. एप्रिल ते मे 2024 दरम्यान त्याने एका महिन्यात 14 वेळा बाथरूम ब्रेक घेतले. त्यापैकी एक ब्रेक जवळजवळ चार तासांचा होता. सतत बाथरूमला जात असल्याने कंपनीने त्याला नोकरीवरून काढून टाकलं. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचलं.
advertisement
3/7
कंपनीने म्हटलं आहे की लीची जबाबदारी अशी आहे की त्याने नेहमी उपलब्ध राहायला हवं. कामाशी संबंधित मेसेजना लगेच रिप्लाय द्याला हवा. पण जेव्हा जेव्हा मॅनेजमेंटने त्याची अनुपस्थिती लक्षात घेतली आणि चॅट अॅपद्वारे त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
advertisement
4/7
त्यानंतर कंपनीने कोर्टात सीसीटीव्ही फुटेज सादर केले, ज्यामध्ये ली सतत आणि बराच वेळ बाथरूमला जात असल्याचं दिसून आलं. कंपनीच्या नियमांनुसार, परवानगीशिवाय कामाचं ठिकाण सोडणं म्हणजे गैरहजर राहणं मानलं जातं. 180 दिवसांपैकी 3 दिवस अनुपस्थित राहिल्यास लगेच नोकरीवरून काढून टाकलं जाऊ शकतं.
advertisement
5/7
आपल्या बचावात लीने मे आणि जून 2024 मध्ये ऑनलाइन खरेदी केलेल्या मूळव्याधीच्या औषधांच्या पावत्या आणि जानेवारी 2025 मध्ये झालेल्या शस्त्रक्रियेतील रुग्णालयातील नोंदी सादर केल्या. आजारपणामुळे त्याला दीर्घकाळ विश्रांती घ्यावी लागली आणि त्यांची बडतर्फी बेकायदेशीर असल्याचा दावा त्याने केला. तसंच 320000 युआन म्हणजे 40,75,000 रुपये भरपाई मागणी केली.
advertisement
6/7
न्यायालयाने असा निर्णय दिला की लीने घेतलेला वेळ शारीरिकदृष्ट्या आवश्यक असलेल्या वेळेपेक्षा जास्त होता. वैद्यकीय नोंदींमध्ये अनेक उल्लंघनांचा समावेश असल्याचंदेखील नमूद केले. लीने कंपनीला त्याच्या आजाराची माहिती दिली नाही किंवा आजारी रजेसाठी अर्ज केला नाही, ज्यामुळे कराराच्या अटींचे उल्लंघन झाले. दोन सुनावणींनंतर कोर्टाने मध्यस्थी केली. लीची कंपनीतील सेवा आणि बेरोजगारीचा त्रास लक्षात घेऊन कंपनीला 30000 युआन म्हणजे 3,80,000 रुपये भरपाई देण्यास सांगितलं.
advertisement
7/7
रिपोर्टनुसार चीनमध्ये यापूर्वीही अशी प्रकरणं घडली आहेत. 2023 मध्ये जियांग्सूमधील आणखी एका कर्मचाऱ्याला सहा तासांचा बाथरूम ब्रेक घेतल्याबद्दल कामावरून काढून टाकलं आणि न्यायालयाने कंपनीचा निर्णय कायम ठेवला. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
अजब प्रकरण! बाथरूमला गेला इंजिनीअर, बॉसने कर्मचाऱ्याला नोकरीवरूनच काढून टाकलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल