TRENDING:

अभिनेत्याची संपत्ती 2700 कोटी, तरीही मुलगा घालतो सेकंड हँड कपडे, स्वतःच बनवतो जेवण, करतो धुणीभांडी

Last Updated:
बॉलिवूडमध्ये एक सुपरस्टार आहे ज्याच्याकडे तब्बल 2700 कोटींहून अधिक संपत्ती आहे, पण त्याचा मुलगा मात्र आजही सेकंड हँड कपडे घालतो, स्वतःच स्वयंपाक करतो आणि भांडीही घासतो!
advertisement
1/9
अभिनेत्याची संपत्ती 2700 कोटी, तरीही मुलगा घालतो सेकंड हँड कपडे, करतो धुणीभांडी
मुंबई: पैसा आला की लोक स्वतःसाठी आणि मुलांसाठी आलिशान जीवन जगायला सुरुवात करतात, हा सर्वसामान्य समज आहे. पण बॉलिवूडमध्ये एक सुपरस्टार आहे जो या सगळ्याला एक अपवाद ठरला आहे.
advertisement
2/9
अभिनेत्याची संपत्ती 2700 कोटी, तरीही मुलगा घालतो सेकंड हँड कपडे, करतो धुणीभांडी
त्याच्याकडे तब्बल २,७०० कोटींहून अधिक संपत्ती आहे, पण त्याचा मुलगा मात्र आजही सेकंड हँड कपडे घालतो, स्वतःच स्वयंपाक करतो आणि भांडीही घासतो! ही गोष्ट जर कुणी तिसऱ्या व्यक्तीने सांगितली असती, तर कदाचित कुणी विश्वास ठेवलं नसतं, पण खुलासा खुद्द या अभिनेत्यानेच केला आहे.
advertisement
3/9
हा सुपरस्टार दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार आहे. अक्षय कुमारने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा २२ वर्षांचा मुलगा आरव भाटियाला बॉलिवूडमध्ये जराही रस नाही.
advertisement
4/9
वडील अक्षय कुमार, आई ट्विंकल खन्ना आणि आजी डिंपल कपाडिया, आजोबा राजेश खन्ना अशा दोन्ही पिढ्या सुपरस्टार्स असलेल्या कुटुंबातील सदस्य असूनही आरवने स्वतःचा वेगळा मार्ग निवडला आहे.
advertisement
5/9
सध्या तो लंडनमध्ये राहून फॅशन डिझाइनचा कोर्स करत आहे. अनेक सेलिब्रिटींची मुलं रेड कार्पेटवर आणि हाय-फाय पार्ट्यांमध्ये झळकतात, पण आरव मात्र या सगळ्यापासून दूर राहून अत्यंत 'लो प्रोफाइल' जीवन जगतोय. त्याचे सोशल मीडियावरचे फोटो आणि सार्वजनिक ठिकाणी दिसणंही खूप कमी आहे.
advertisement
6/9
अक्षय कुमारने सांगितलं की, आरवने अवघ्या १५ वर्षांच्या असतानाच आपलं घर सोडलं होतं. आज तो लंडनमध्ये एकटा राहतो आणि घरातली सर्व कामं स्वतःच करतो. अक्षयने अभिमानाने सांगितलं, की आरव फक्त स्वतःसाठी जेवण बनवत नाही, तर जेवण झाल्यावर भांडीही स्वतःच घासतो.
advertisement
7/9
ब्रँडेड दुकानातून महागडे कपडे विकत घेण्याऐवजी, तो लंडनच्या रस्त्यांवरील फुटपाथवरून शॉपिंग करतो आणि त्याला अनेकदा सेकंड हँड कपडे विकत घेऊन वापरतानाही पाहिलं गेलं आहे. कुटुंबाकडे आलिशान आयुष्य जगण्याची क्षमता असूनही, आरव स्वतःचे कपडे स्वतः धुतो आणि एक स्वतंत्र, स्वावलंबी आयुष्य जगतोय.
advertisement
8/9
आरवचं शिक्षण मुंबईतील इकोले मोंडियल वर्ल्ड स्कूलमधून सुरू झालं आणि त्याने सिंगापूरच्या युनायटेड वर्ल्ड कॉलेजमधून आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. सध्या तो लंडनमध्ये फॅशन डिझाइनचा अभ्यास करत आहे. त्याला लहानपणापासूनच मार्शल आर्ट्सचीही आवड आहे.
advertisement
9/9
त्याला नवनवीन आणि क्रिएटिव्ह गोष्टी करायला आवडतात, पण बॉलिवूडमध्ये करिअर करण्याबद्दल तो विचारही करत नाही. सोशल मीडियावर काही वेळा आरवची तुलना त्याचे आजोबा राजेश खन्ना यांच्या लूकमध्ये केली गेली, पण त्याने बॉलिवूडमध्ये येण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अभिनेत्याची संपत्ती 2700 कोटी, तरीही मुलगा घालतो सेकंड हँड कपडे, स्वतःच बनवतो जेवण, करतो धुणीभांडी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल