शाहरुखच्या कानाखाली मारली, पुन्हा दिसलीच नाही; 20 वर्षांपासून अभिनेत्री कुठे गायब झाली?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Shahrukh Khan : अभिनेता शाहरुखच्या कानाखाली मारणारी ही अभिनेत्री 20 वर्षांपासून इंडस्ट्रीपासून दूर आहे. कुठे आहे ती? करते काय?
advertisement
1/9

90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक नवीन अभिनेत्री आल्या. काही हिट झाल्या तर काही फ्लॉप झाल्या. काही त्यांच्या ग्लॅमरमुळे अनेक वर्ष लक्षात राहिल्या.
advertisement
2/9
शाहरुखच्या सिनेमातील अशीच एक अभिनेत्री. जी तिच्या सिनेमांमुळे आणि सौंदर्यामुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. ही तिच अभिनेत्री आहे जिनं ऑनस्क्रिन शाहरुखच्या कानाखाली मारली होती.
advertisement
3/9
शाहरुखच्या कानाखाली मारणारी ती अभिनेत्री आज इंडस्ट्रीपासून दूर आहे. ती कुठे गेली, आता काय करते?
advertisement
4/9
'सिर्फ तुम' हा सिनेमा तुम्हाल आठवत असेल तर या सिनेमात आरतीची भूमिका साकारणारी ती अभिनेत्की प्रिया गिल असं तिचं नाव आहे. ही अभिनेत्री आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
advertisement
5/9
प्रिया गिलचा जन्म पंजाबमध्ये झाला. तिने मॉडेलिंगमधून कारकिर्दीला सुरुवात केली. 1995 मध्ये ती 'फेमिना मिस इंडिया' स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचली. त्यानंतर बॉलिवूडमध्ये तिला संधी मिळाल्या.
advertisement
6/9
'तेरे मेरे सपने' या चित्रपटातून तिला पहिला ब्रेक मिळाला. 1999 मध्ये आलेल्या 'सिर्फ तुम' या सिनेमाने प्रियाच्या करिअरला वेग दिला. संजय कपूरसोबतच्या तिच्या भूमिकेला भरपूर प्रेम मिळालं. साधा लूक, कमी मेकअप आणि सहज अभिनयामुळे प्रिया गिल अल्पावधीतच चर्चेत आली.
advertisement
7/9
'सिर्फ तुम' नंतर 1999 मध्येच जोष हा आणखी एक मोठा चित्रपट तिला मिळाला. या चित्रपटात तिने शाहरुख खानची प्रेयसी रोझीची भूमिका केली. त्याच चित्रपटात ऐश्वर्या रायने शाहरुखची बहीण साकारली होती.
advertisement
8/9
या सिनेमात एक सीन होता जिथे प्रियाने शाहरुख खानच्या कानाखाली मारली होती. तिने मारलेली ती कानाखाली आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्या काळच्या शाहरुखच्या प्रचंड लोकप्रिय होती.
advertisement
9/9
मिडिया रिपोर्टनुसार, प्रिया गिल सध्या डेन्मार्कमध्ये राहते. ती विवाहित असून पूर्णपणे सामान्य आयुष्य जगते. जवळपास दोन दशकांपासून ती चित्रपटसृष्टी, सोशल मीडिया आणि सार्वजनिक आयुष्यातून पूर्णपणे दूर आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
शाहरुखच्या कानाखाली मारली, पुन्हा दिसलीच नाही; 20 वर्षांपासून अभिनेत्री कुठे गायब झाली?