एका आयटम साँगमुळे संपलं असतं माधुरीचं करिअर, चढावी लागली कोर्टाची पायरी; बाळासाहेबांनी मिटवलं प्रकरण
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood Controversial Songs : असं एक गाणं आहे ज्यामुळे देशभर मोठा गदारोळ माजला होता. हे गाणे इतके वादग्रस्त ठरले की, त्याला कोर्टाची पायरी चढावी लागली होती आणि दूरदर्शन तसेच ऑल इंडिया रेडिओने या गाण्यावर बंदी घातली होती.
advertisement
1/10

मुंबई: बॉलिवूडमध्ये अशी अनेक गाणी आहेत, जी त्यांच्या काळात गाजली. पण त्यानंतर त्यांच्या रिमिक्स गाण्यांनीही धुमाकूळ घातला. आजही अनेक गाण्यांचे रिमेक आणि रिमिक्स केले जातात. पण तुम्हाला माहीत आहे का, असं एक गाणं आहे ज्यामुळे त्या काळात देशभर मोठा गदारोळ माजला होता?
advertisement
2/10
इतकेच नव्हे, तर हे गाणे इतके वादग्रस्त ठरले की, त्याला कोर्टाची पायरी चढावी लागली होती आणि दूरदर्शन तसेच ऑल इंडिया रेडिओने या गाण्यावर बंदी घातली होती.
advertisement
3/10
१९९३ मध्ये आलेल्या 'खलनायक' या चित्रपटातील 'चोली के पीछे क्या है' हे गाणे आजही सुपरहिट आहे. सुभाष घई यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका होत्या.
advertisement
4/10
केवळ ४ कोटी रुपये खर्चून बनलेल्या या सिनेमाने तिकिटबारीवर २१ कोटी रुपयांची कमाई केली. पण या हिट सिनेमातील एका गाण्याने मोठी समस्या निर्माण केली.
advertisement
5/10
अलका याज्ञिक आणि इला अरुण यांनी गायलेले हे गाणे 'चोली के पीछे क्या है' प्रचंड लोकप्रिय झाले, पण त्याच्या गीतावरून लोकांना प्रचंड आक्षेप होता.
advertisement
6/10
गाण्याचे बोल अश्लील आणि महिलांविरोधात असल्याचा आरोप करत अनेक लोकांनी याविरोधात आवाज उठवला. हा वाद इतका वाढला की, तक्रारदारांनी थेट न्यायालयात धाव घेतली.
advertisement
7/10
तक्रारदारांनी मागणी केली की, सेन्सॉर बोर्डाने हे गाणे चित्रपटातून काढून टाकावे आणि तोपर्यंत जेवढ्या कॅसेट विकल्या गेल्या आहेत, त्या परत मागवाव्यात. पण कोर्टाने या गाण्यात काहीही आक्षेपार्ह नसल्याचे सांगत हे प्रकरण निकाली काढले.
advertisement
8/10
विशेष म्हणजे, न्यायालयाने या गाण्याला क्लिन चिट देऊनही वाद शमला नाही. तेव्हा बाळ ठाकरे यांनी पुढे येत, "या गाण्यात काहीही अश्लील नाही, त्यामुळे विरोध करणे बंद करा," असे स्पष्ट मत व्यक्त केले.
advertisement
9/10
न्यायालयाने हे गाणे योग्य ठरवले असले तरी, दूरदर्शन आणि आकाशवाणीने मात्र हे गाणे आपल्या स्तरावर बॅन केले. त्यामुळे बऱ्याच कालावधीसाठी हे गाणे टीव्ही किंवा रेडिओवर ऐकायला मिळाले नाही.
advertisement
10/10
आता २०२४ मध्ये आलेल्या करीना कपूर, तब्बू आणि कृती सेननच्या 'क्रू' चित्रपटात या गाण्याचा रिमेक वापरण्यात आला आहे, जो प्रेक्षकांना खूप आवडला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
एका आयटम साँगमुळे संपलं असतं माधुरीचं करिअर, चढावी लागली कोर्टाची पायरी; बाळासाहेबांनी मिटवलं प्रकरण