कारण हे होलसेल दर फक्त दिवाळी साठीच आहे.त्यानंतर बाजारभावानुसार सर्व या दुकानात साहित्य उपलब्ध होणार आहे. मोहन्यामध्ये या दुकानाला 11 वर्ष झाली आहेत.वार्षिक सणांनुसार याठिकाणी पूजा विधी ,होम हवन तसेच घरगुती सण, मंदिराचे कलश पूजन यासारख्या अनेक प्रकारच्या विधीसाठीचे साहित्य या ठिकाणी मिळत असते.तोंडावर आलेल्या दिवाळी साठी दरवर्षी काहीतरी वेगळं मार्केट मध्ये उपलब्ध करायचं यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न असतो.यावर्षी त्यांनी जी मार्केट मध्ये मिळते ते रांगोळी कलर आणलेतच विशेष म्हणजे पाण्यावर काढायची रांगोळी आणि एक कलर पासून 3 कलर बनवायचे ते ही कलर या दुकानात मिळून जातील.
advertisement
सामान्य माणसांना तेलाचा भाव पडवण्या पलिकडे आहे त्यामुळे 84 रु च्या 12 पणत्या या दुकानात उपलब्ध आहेत.तसेच देवाचे वस्त्र 5 रु पासून 400 रु पर्यंत या ठिकाणी मिळतात. पूजा भांडार चे मुख्य उद्देश हे आहे की येणारा कोणताही व्यक्ती असो आमच्या दुकानातून रिकामे हात जाता कामा नये म्हणून आम्ही या कमी भावात लोकांपर्यंत चांगल्या वस्तू पोचण्याचा प्रयत्न करत आहोत. गरजू आणि गरीब यांची दिवाळी आनंदात आणि भरभराटी ची जावो यासाठी आम्ही या ऑफर लावल्या आहेत. ही फक्त दिवाळी पुरताच मर्यादित आहेत.इतर वेळी पूजा भांडार मध्ये बाजारभावापेक्षा कमी रेट असेल पण वस्तू आजच्या भावात भेटेल त्या नंतर नाही भेटणार.त्यामुळे दिवाळी सारख्या मोठ्या सणांच्या वेळी 2 लाख पर्यंत महिन्याला नफा मिळवत असल्याचे त्यांनी सांगितले.