TRENDING:

वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video

Last Updated:

वारंवार असे झाल्यास गाडी ब्लॅक लिस्ट होण्याचा धोका असतो. जर तुम्ही ट्रॅफिक चलान वेळेवर भरले नाही तर तुमची गाडी ब्लॅक लिस्ट केली जाते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : पूर्वी वाहतूक नियम मोडणाऱ्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करणे फार कठीण जात असे. आता मात्र, रस्त्यांवर ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. गाडी चालवताना कोणताही नियम मोडल्यास हे कॅमेरे लगेच गाडीचा फोटो काढतात. यानंतर गाडी चालकाच्या मोबाइलवर चालानचा मेसेज येतो. काही लोकांना चालान फाटल्याची माहितीही कळत नाही किंवा त्यांना मेसेजही दिसत नाही. अशा स्थितीत त्यांना दंडाबाबत माहिती मिळत नाही आणि ते दंड भरतही नाहीत. वारंवार असे झाल्यास गाडी ब्लॅक लिस्ट होण्याचा धोका असतो. जर तुम्ही ट्रॅफिक चलान वेळेवर भरले नाही तर तुमची गाडी ब्लॅक लिस्ट केली जाते.
advertisement

तीन महिन्यांच्या आत वाहतूक चालान भरणे बंधनकारक आहे. 90 दिवसांच्या कालावधीमध्ये एखाद्या वाहनाची पाच चालान न भरल्यास वाहतूक विभाग संबंधित वाहनाला ब्लॅक लिस्ट करते. केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मध्ये ई-चलानची तरतूद आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास वाहतूक पोलीस चलानातील दंड वसूल करू शकतात. वाहनाच्या मालकाने किंवा ज्याच्या नावाने चालान जारी केले आहे.

advertisement

Success Story : नोकरी सोडली, उच्चशिक्षित बहिणींनी सुरू केला व्यवसाय, महिन्याला लाखांची कमाई

गाडी ब्लॅक लिस्ट झाल्याचे परिणाम?

तुमची गाडी ब्लॅक लिस्ट असेल तर तुम्हाला तिची विक्री करता येणार नाही. परिणामी गाडीच्या नवीन मालकाचे नाव वाहनाच्या रेकॉर्डमध्ये दिसत नाही. जर तुमच्या गाडीचा इन्शुरन्स संपला असेल किंवा संपणार असेल तर तो रिन्यू करता येणार नाही. ब्लॅक लिस्टेड गाडीसाठी नवीन इन्शुरन्स कव्हर खरेदी करता येत नाही. वाहन चालविण्यासाठी प्रदूषण नियंत्रण (पीयूसी) सर्टिफिकेट गरजेचं आहे. पीयूसी सर्टिफिकेट नसल्यास वाहतूक पोलीस दंड वसूल करू शकतात. गाडी ब्लॅकलिस्ट असल्यास पीयूसी सर्टिफिकेट काढता येत नाही.

advertisement

जर एखाद्या वाहनासाठी पाच चलनं जारी केली गेली आहेत आणि 90 दिवसांच्या आत तो दंड जमा केला नसेल तर ते वाहन ब्लॅक लिस्ट होऊ शकते. तुम्ही वाहन पोर्टलला भेट देऊन तुमच्या वाहनाचा तपशील तपासू शकता. येथून तुम्हाला पेंडिंग चालानाची माहिती मिळेल. याशिवाय तुमची गाडी ब्लॅक लिस्ट असेल तर तेही समजेल.

advertisement

वाहन ब्लॅकलिस्टमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियमभंग झाल्यास जारी होणारे ई-चलान नियमितपणे तपासणे आणि वेळेवर दंड भरणे. सर्वप्रथम वाहनधारकांनी वाहन पोर्टल (vahan.parivahan.gov.in) किंवा ई-चलान पोर्टल (echallan.parivahan.gov.in) वर जाऊन आपल्या वाहनाचा नंबर टाकून प्रलंबित चालान आहेत का ते तपासावे. मोबाईलवर येणारे एसएमएस लक्षपूर्वक वाचावेत आणि मेसेज न आल्यासही दर महिन्याला एकदा पोर्टल तपासणे आवश्यक आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

नियमभंग टाळण्यासाठी हेल्मेट, सीटबेल्ट, गतीमर्यादा, सिग्नल पाळणे, योग्य पार्किंग अशा नियमांचे काटेकोर पालन करावे, कारण प्रत्येक उल्लंघन लगेच सीसीटीव्हीत कॅप्चर होते. 90 दिवसांच्या आत दंड भरणे बंधनकारक असल्यामुळे एकही चालान प्रलंबित राहू देऊ नये. जर वारंवार चालान होत असतील तर आपल्या वाहनावर फास्टॅग, नंबर प्लेट, पीयूसी किंवा वाहन कागदपत्रांमध्ये काही समस्या आहेत का, हेही तपासून घेणे गरजेचे आहे. सर्व कागदपत्रे—आरसी, इन्शुरन्स, पीयूसी—नेहमी अद्ययावत ठेवा. अशा प्रकारे नियमित तपासणी, नियमांचे पालन आणि वेळेवर दंड भरण्याची सवय ठेवली तर वाहन ब्लॅकलिस्ट होण्याचा धोका पूर्णपणे टाळता येतो.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल