advertisement

Sambhajinagar News : काळीज सुन्न करणारी घटना, पतीच्या विरहात माऊलीने अवघ्या काही क्षणात सोडला जगाचा निरोप

Last Updated:

‎Chhatrapati Sambhajinagar News : सिल्लोड तालुक्यातील केन्हाळा येथे पतीच्या निधनाचा आघात सहन न झाल्याने पत्नीने त्याचा धसका घेतला आणि गावातील प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत आहे.

पतीच्या निधनाचा आघात सहन न झाल्याने पत्नीनेही प्राण त्यागले
पतीच्या निधनाचा आघात सहन न झाल्याने पत्नीनेही प्राण त्यागले
छत्रपती संभाजीनगर : पती-पत्नीचं नातं म्हणजे केवळ संसार नव्हे तर एकमेकांच्या श्वासाशी जोडलेली भावनिक नाळ असते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देणारे हे नातं.जोडीदाराच्या अचानक जाण्याने पूर्णपणे कोलमडून जातं. अशाच अतूट प्रेमाच्या नात्याची हृदयद्रावक समाप्ती सिल्लोड तालुक्यातील केन्हाळा येथे पाहायला मिळाली.
पतीच्या देहापाशीच पत्नीनेही प्राण सोडले
‎पतीची प्राणज्योत मावळल्यानंतर काही तासांतच पत्नीनेही प्राण त्यागल्याची हृदयद्रावक घटना सिल्लोड तालुक्यातील केन्हाळा येथे घडली. रावसाहेब अमृता पांढरे (वय 65) आणि रत्नकलाबाई रावसाहेब पांढरे (वय 60) असे या दिवंगत दाम्पत्याचे नाव आहे. केन्हाळा येथील रहिवासी असलेल्या रावसाहेब पांढरे यांना दम्याचा त्रास होता. त्यातूनच गुरुवारी (दि. 29) रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली.
advertisement
कुटुंबीय त्यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर नातेवाइकांनी त्यांचे पार्थिव घरी आणले.
‎पतीचे पार्थिव पाहताच पत्नी रत्नकलाबाई पांढरे यांना जबर धक्का बसला आणि त्या क्षणात जमिनीवर कोसळल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तत्काळ छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. पतीच्या निधनाचा अतीव मानसिक ताण घेतल्याने त्यांच्या मेंदूतील नस फाटून रक्तस्राव झाला होता. हे रक्त गोठल्याने त्या कोमात गेल्या.
advertisement
पती-पत्नीच्या निधनाने परिसरात हळहळ
‎दरम्यान शुक्रवारी रावसाहेब पांढरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पतीच्या चितेची राख थंडही झाली नव्हती तोच शनिवारी सकाळी 10 वाजता रत्नकलाबाई पांढरे यांनीही अखेरचा श्वास घेतला. काही तासांच्या अंतराने पती-पत्नीचे आयुष्य संपल्याची वार्ता कळताच संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.
‎शनिवारी दुपारी रत्नकलाबाई पांढरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी दाम्पत्यामागे एक मुलगा, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Sambhajinagar News : काळीज सुन्न करणारी घटना, पतीच्या विरहात माऊलीने अवघ्या काही क्षणात सोडला जगाचा निरोप
Next Article
advertisement
Sunetra Pawar : अजित पवार गटाच्या नेत्यांची 'ती' गुप्त बैठक अन्  शरद पवारांना धोबीपछाड, 'ऑपरेशन देवगिरी'ची इनसाइड स्टोरी
'ती' गुप्त बैठक अन् शरद पवारांना धोबीपछाड, 'ऑपरेशन देवगिरी'ची Inside Story
  • राज्याच्या राजकारणात एकामागून एक धक्कादायक घडामोडी घडत आहेत.

  • राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोठ्या हालचाली करत सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री

  • ही घटना फक्त शपथविधीपर्यंच मर्यादित नसून पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडल्या

View All
advertisement