TRENDING:

Bollywood Disaster Movie : बॉलिवूडचा महाफ्लॉप सिनेमा; 5 वर्षांची मेहनत, 210 कोटींचं बजेट, सगळं गेलं पाण्यात

Last Updated:
Bollywood Disaster Movie : बॉलिवूडमध्ये एखाद्या चित्रपटासाठी इतकी वर्षे वाट पाहणं, करोडोंची गुंतवणूक करणं आणि नंतर त्याचे सगळे स्वप्न धुळीस मिळणं, असंच काहीसं एका सिनेमासोबत घडलं.
advertisement
1/7
बॉलिवूडचा महाफ्लॉप सिनेमा; 5 वर्षांची मेहनत, 210 कोटींचं बजेट, सगळं गेलं पाण्यात
बॉलिवूडमध्ये एखाद्या चित्रपटासाठी इतकी वर्षे वाट पाहणं, करोडोंची गुंतवणूक करणं आणि नंतर त्याचे सगळे स्वप्न धुळीस मिळणं, असंच काहीसं एका सिनेमासोबत घडलं. 5 वर्षांची मेहनत, 210 कोटींचा खर्च सगळं पाण्यात गेलं. हा महाफ्लॉप सिनेमा कोणता आहे? याविषयी जाणून घेऊया.
advertisement
2/7
आपण बोलत असलेल्या हा सिनेमा आहे अजय देवगण स्टारर बोनी कपूर निर्मीत 'मैदान'. 2024 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट अजय देवगणच्या दमदार भूमिकेमुळे खूप चर्चेत आला. पण चित्रपटाचं खरं नाटक पडद्यामागे घडलं.
advertisement
3/7
पाच वर्षे चाललेला संघर्ष, कोविड लॉकडाऊन, चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेला सेट, आणि युनिटची व्यवस्था ठेवण्यासाठी झालेले कोट्यवधींचे खर्च यामुळे हा चित्रपट इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या आर्थिक डिजास्टरपैकी एक ठरला.
advertisement
4/7
सुरुवातीला ‘मैदान’चं बजेट 120 कोटी रुपये ठरवण्यात आलं होतं. पण अखेर हा खर्च 210 कोटींवर गेला. बोनी कपूर यांनी सांगितलं की, कोविळ काळ असल्यामुळे 800 लोकांच्या युनिटसाठी दररोज ताज हॉटेलमधून जेवण मागवावं लागलं. सेटवर रुग्णवाहिका, डॉक्टर, वेगळे तंबू, सोशल डिस्टन्सिंगसाठी वेगळी सोय हे सगळं महिनोन्‌महिने सुरू होतं.
advertisement
5/7
चित्रपटाच्या अर्ध्याहून अधिक बजेट फक्त पाण्यावर खर्च झाला. डिस्टिल्ड वॉटरची सोय करण्यासाठी केलेला करार इतका महागडा होता की, त्यावरून छोटे-मोठे चित्रपट बनवता आले असते. जवळपास साडेतीन वर्षे हा खर्च सतत सुरू होता.
advertisement
6/7
सगळ्या संकटातून बाहेर येऊन ‘मैदान’ अखेर एप्रिल 2024 मध्ये रिलीज झाला. पण हा चित्रपट फक्त 68 कोटींची कमाई करू शकला. म्हणजे बजेटच्या अर्ध्यालाही पोहोचला नाही. बॉक्स ऑफिसवर अपयश आलं आणि बोनी कपूर यांना स्वतः विक्रेत्यांना पैसे फेडण्यासाठी कर्ज काढावं लागलं.
advertisement
7/7
‘मैदान’ ही केवळ क्रीडा-नाटकाची फिल्म नव्हती, तर ती 1950 ते 1960 च्या दशकात भारतीय फुटबॉल संघाला जागतिक स्तरावर नेणारे प्रशिक्षक सैयद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित होती. हा भारतीय फुटबॉलच्या ‘सुवर्णयुगाचा’ प्रवास दाखवणारा चित्रपट होता. पण प्रेक्षकांची पावले चित्रपटगृहापर्यंत पोहोचली नाहीत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bollywood Disaster Movie : बॉलिवूडचा महाफ्लॉप सिनेमा; 5 वर्षांची मेहनत, 210 कोटींचं बजेट, सगळं गेलं पाण्यात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल