कधीच स्क्रीनवर दिसला नाही, फक्त 3 शब्द बोलून कमावले तब्बल 132 कोटी, कोण आहे हा अभिनेता?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Hollywood Actor : हा अभिनेता चित्रपटात कधीच पडद्यावर दिसत नाही आणि फक्त तीनच शब्द बोलतो, तरीही त्याला एका चित्रपटासाठी तब्बल १३५ कोटी रुपये मिळतात.
advertisement
1/8

मुंबई: आजच्या जगात सिनेमाचा व्यवसाय इतका मोठा झाला आहे की, कलाकार एका चित्रपटातून करोडोंची कमाई करतात. पण, एका हॉलीवूड अभिनेत्याची कमाई ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
advertisement
2/8
हा अभिनेता चित्रपटात कधीच पडद्यावर दिसत नाही आणि फक्त तीनच शब्द बोलतो, तरीही त्याला एका चित्रपटासाठी तब्बल १२५ कोटी रुपये मिळतात.
advertisement
3/8
'फास्ट अँड फ्युरियस' या लोकप्रिय सिरीजमुळे प्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणजे विन डिझेल. या सिरीजमधील एका चित्रपटासाठी त्याला ४७ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास ४०० कोटी रुपये मिळाले होते, पण त्याची खरी कमाई 'मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स'च्या 'ग्रूट' या पात्रातून झाली आहे.
advertisement
4/8
२०१४ मध्ये आलेल्या 'गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी' या चित्रपटातून विन डिझेलने 'ग्रूट' या पात्राला आवाज दिला. हा 'ग्रूट' फक्त तीनच शब्द बोलतो- 'मी ग्रूट आहे' ('I am Groot').
advertisement
5/8
या तीन शब्दांसाठी विन डिझेलला एका चित्रपटासाठी १२-१५ दशलक्ष डॉलर्स, जवळपास १००-१३५ कोटी रुपये मिळाले, असं म्हटलं जातं.
advertisement
6/8
काही वर्षांपूर्वी, विन डिझेल 'ग्रूट'च्या भूमिकेसाठी एका चित्रपटाचे १३.५ दशलक्ष डॉलर्स घेतो, असा दावा करण्यात आला होता. पण 'गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी'चे दिग्दर्शक जेम्स गन यांनी हा दावा खोटा असल्याचं सांगितलं.
advertisement
7/8
मात्र, आजही अनेक रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं जातं की, विन डिझेलची 'ग्रूट'च्या भूमिकेतून कमाई १२-१५ दशलक्ष डॉलर्सच्या घरात आहे. व्हॉइस अॅक्टरसाठी हा खूपच मोठा आकडा आहे.
advertisement
8/8
विन डिझेलने आतापर्यंत पाच चित्रपटांमध्ये 'ग्रूट'ला आवाज दिला आहे, पण त्यात फक्त एकदाच त्याने 'मी ग्रूट आहे' ऐवजी 'आम्ही ग्रूट आहोत' (We are Groot) असं म्हटलं होतं. विन डिझेल लवकरच त्याच्या 'रिडिक: फ्युरिया' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कधीच स्क्रीनवर दिसला नाही, फक्त 3 शब्द बोलून कमावले तब्बल 132 कोटी, कोण आहे हा अभिनेता?