Rajesh Khanna : राजेश खन्नांचा बोल्ड सिनेमा, फक्त 9 थिएटरमध्ये झाला प्रदर्शित; केलेला कोट्यवधींचा गल्ला
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Rajesh Khanna : बॉलिवूडमध्ये "पहिला सुपरस्टार" म्हटलं की डोळ्यासमोर राजेश खन्नाच येतात. त्यांच्या चाहत्यांचा उत्साह इतका होता की थिएटरच्या बाहेर लांबलचक रांगा लागत आणि स्क्रीनवर त्यांच्या एन्ट्रीला फटाक्यांची आतषबाजी होत असे.
advertisement
1/7

बॉलिवूडमध्ये "पहिला सुपरस्टार" म्हटलं की डोळ्यासमोर राजेश खन्नाच येतात. त्यांच्या चाहत्यांचा उत्साह इतका होता की थिएटरच्या बाहेर लांबलचक रांगा लागत आणि स्क्रीनवर त्यांच्या एन्ट्रीला फटाक्यांची आतषबाजी होत असे.
advertisement
2/7
मात्र या सुपरस्टारच्या आयुष्यातही काही काळ असा आला जेव्हा सलग काही चित्रपट फ्लॉप ठरले आणि त्यांच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. एक सिनेमाने मात्र त्यांतं नशीब बदललं.
advertisement
3/7
याच काळात एक असा चित्रपट आला ज्याने केवळ राजेश खन्नालाच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीलाही नवं वळण दिलं. हा चित्रपट होता 'दाग' 1973 रिलीज झालेला. ‘दाग’ हा केवळ राजेश खन्नासाठी पुनरागमन नव्हता, तर यश चोप्रांसाठी नव्या सुरुवातीचं दार ठरला. या चित्रपटाद्वारेच ‘यशराज फिल्म्स’ या बॅनरची स्थापना झाली. पुढे हाच बॅनर बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या निर्मिती संस्थांपैकी एक ठरला.
advertisement
4/7
त्या काळात या चित्रपटाची कथा थोडी बोल्ड मानली जात होती. त्यामुळे यश चोप्रांना भीती होती की प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील. त्यांनी हा चित्रपट फक्त 9 थिएटरमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला. बजेटही खूप मर्यादित होतं संपूर्ण चित्रपटावर फक्त 1.40 लाख रुपये खर्च झाले.
advertisement
5/7
राखीने चित्रपटासाठी केवळ 3 लाख रुपये मानधन घेतलं. शर्मिला टागोरनेही कमी पैसे घेतले. राजेश खन्नाने तर सुपरस्टार असूनही धोका पत्करून कमी फीवर काम केलं.
advertisement
6/7
सुरुवातीला मर्यादित प्रमाणात प्रदर्शित झालेला हा चित्रपट पुढे प्रचंड यशस्वी ठरला. फक्त ९ थिएटरमधून सुरुवात करून ‘दाग’ने बॉक्स ऑफिसवर तब्बल 6.50 कोटी रुपये कमावले. त्या काळात ही आकडेवारी प्रचंड मोठी मानली जायची.
advertisement
7/7
या यशामुळे राजेश खन्नाची लोकप्रियता पुन्हा शिगेला पोहोचली आणि त्यांचा “सुपरस्टार” दर्जा अजून पक्का झाला. त्याचवेळी यश चोप्रांच्या कारकिर्दीला सोन्याचा धागा मिळाला. पुढे त्यांनी ‘कभी कभी’, ‘सिलसिला’, ‘दिल तो पागल है’ आणि ‘वीर-झारा’सारखे सुपरहिट चित्रपट दिले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rajesh Khanna : राजेश खन्नांचा बोल्ड सिनेमा, फक्त 9 थिएटरमध्ये झाला प्रदर्शित; केलेला कोट्यवधींचा गल्ला