सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत, रेल्वे ट्रॅकच्या अगदी जवळ एक व्यक्ती हातात काठी घेऊन उभा आहे. त्याचवेळी एक जलदगतीने ट्रेन जात असते आणि तिच्या गेटवरून दुसरा माणूस मोबाईल हातात घेऊन व्हिडिओ बनवत असतो. खाली उभा असलेली व्यक्ती काठीने त्या मोबाईलवर जोरदार फटका मारतो. ज्यामुळे व्यक्तीच्या हातातून मोबाईल खाली पडतो आणि ट्रेन पुढे गेल्यानंतर तो व्यक्ती फोन उचलून पळ काढतो.
advertisement
हा व्हिडिओ @printf_meme_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि त्याला लाखो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. काहींनी याला “चोराची हिम्मत” म्हटलं, तर काहींनी “अशा कृत्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो” असे कमेंट्स केले. एकाने तर थेट लिहिलं, “फक्त लाइक्स आणि व्ह्यूजसाठी असा प्रकार? अतिशय चुकीचं!” अनेकांनी रेल्वे पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे, कारण ही फक्त चोरी नाही तर जीव धोक्यात घालणारं कृत्य आहे.
AI will take your job pic.twitter.com/nxrvK45mwe
— विक्रम