Bigg Boss मध्ये आले आणि आता Good News! लग्नाच्या 12 वर्षांनी आईबाबा बनणार सेलिब्रिटी कपल?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Sargun Mehta Ravi Dubey : भारती सिंग, गौहर खान या दोघी नुकत्याच दुसऱ्या बाळाच्या आई झाल्या आहेत. आता आणखी एक अभिनेत्री तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार असल्याची चर्चा आहे.
advertisement
1/5

बिग बॉसच्या घरात कपल्सची चर्चाही नेहमीच असते. बिग बॉसच्या घरात काहींच्या जोड्या जुळल्या आहेत, तर काही कपलही बिग बॉसमध्ये गेले आहेत. अशाच बिग बॉसमध्ये गेलेल्या कपल्सपैकी एक कपल जे बिग बॉसमध्ये जाऊन आल्यावर या कपलकडे गूड न्यूज असल्याची चर्चा आहे.
advertisement
2/5
हे कपल आहे सरगुन मेहता आणि रबी दुबे, जी टीव्ही इंडस्ट्रीतील फेमस जोडी आहे. '12/24 करोल बाग' च्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली आणि इथूनच त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली. या मालिकेत त्यांनी ऑनस्क्रीन कपलची भूमिका केली होती. त्यांचं ऑनस्क्रीन लव्ह खऱ्या आयुष्यातही.
advertisement
3/5
त्यांनी त्यांचे नातं बराच काळ सीक्रेट ठेवलं होतं. त्यानंतर रवीने 'नच बलिये 5' मध्ये सरगुनला प्रपोज केलं आणि 7 डिसेंबर 2013 रोजी त्यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नाला 12 वर्षे झाली, पण त्यांना मूल नाही. आता इतक्या वर्षांनी त्यांच्या घरी पाळणा हलणार असल्याची चर्चा आहे.
advertisement
4/5
टेली क्रिएट्सच्या रिपोर्टनुसार, 12 वर्षांच्या लग्नानंतर सरगुन मेहता आणि रवी दुबे त्यांच्या पहिल्या मुलाची अपेक्षा करत आहेत. पण या दोघांनीही अद्याप कोणतीही अपडेट दिलेली नाही. तरी त्यांची प्रतिक्रिया न देणं किंवा या विषयावर मौन बाळगणं म्हणजेच ही बातमी खरी असल्याचंही म्हटलं जात आहे.
advertisement
5/5
दरम्यान सरगुन आणि रवी आईबाबा होणार असल्याची चर्चा याआधीही झाली होती. जेव्हा ते दोघं त्यांच्या 'ज्युलिएट जट्ट दी' शोच्या प्रमोशनसाठी रिअॅलिटी शो बिग बॉस 19 मध्ये आले होते. यानंतर या दोघांनाही एका हॉस्पिटलच्या बाहेर पाहिलं गेलं, ज्यामुळे चाहत्यांनी त्यांच्याकडे गूड न्यूज असल्याचं म्हटलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss मध्ये आले आणि आता Good News! लग्नाच्या 12 वर्षांनी आईबाबा बनणार सेलिब्रिटी कपल?