Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे साप्ताहिक राशीफळ; फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा लकी, पण..
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Weekly Horoscope: हा आठवडा सर्व राशींसाठी संमिश्र परिणाम घेऊन येणार आहे. काही राशींना कठोर परिश्रमानंतर यश मिळेल, तर काहींना संयम आणि सतर्कता बाळगावी लागेल. काही राशीच्या लोकांना कामाचा ताण, मानसिक ओढाताण, विरोधकांचा त्रास आणि आर्थिक दबाव जाणवू शकतो. आरोग्य, विशेषतः पोटाचे विकार आणि थकवा याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. काही राशींच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल, ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी सांगितलेले मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे साप्ताहिक राशीफळ जाणून घेऊ.
advertisement
1/6

मेष - मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा धावपळीचा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा ताण वाढल्यामुळे चिडचिड होऊ शकते. जमिनीच्या व्यवहारात किंवा कोर्टाच्या कामात अडकलेल्या लोकांनी कागदपत्रांची नीट तपासणी करावी, कारण एखादी छोटी चूक महागात पडू शकते.
advertisement
2/6
मेष राशीच्या व्यापाऱ्यांना तगड्या स्पर्धेचा सामना करावा लागेल, ज्यामुळे नफा अपेक्षेपेक्षा कमी मिळेल. कुटुंबात आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. प्रेमात असलेल्या तरुणांनी तिसऱ्या व्यक्तीच्या सल्ल्याने वागू नये, अन्यथा नात्यात दुरावा येईल. आरोग्यासाठी बाहेरचे खाणे टाळावे.
advertisement
3/6
वृषभ - तुमच्यासाठी हा काळ प्रगतीचा आहे. तुम्ही घेतलेले धाडसी निर्णय तुम्हाला मोठे यश मिळवून देऊ शकतात. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होण्याची शक्यता आहे, विशेषतः घरासाठी चैनीच्या वस्तू खरेदी केल्या जातील. नवीन मालमत्ता किंवा वाहन घेण्याचे योग प्रबळ आहेत. नोकरीत महिला सहकाऱ्यांचे सहकार्य मोलाचे ठरेल. जर तुम्ही विवाहित असाल, तर जोडीदारासोबत पर्यटनाचा बेत आखला जाईल. या आठवड्यात तुमच्या बोलण्यातील गोडव्यामुळे अनेक कठीण कामे सोपी होतील.
advertisement
4/6
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा गोल्डन ठरू शकतो. नशिबाची पूर्ण साथ मिळाल्यामुळे तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील. जर तुम्ही परदेशात शिक्षण घेऊ इच्छित असाल किंवा तिथे व्यवसाय करू इच्छित असाल, तर सकारात्मक बातमी मिळेल. नोकरीत पदोन्नती किंवा पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल, ज्यामुळे मनाला शांती मिळेल. घरामध्ये आनंदाचे वातावरण असेल आणि तुम्ही कुटुंबासोबत सहलीला जाऊ शकता. आरोग्य उत्तम राहील.
advertisement
5/6
कर्क - कर्क राशीच्या लोकांनी या आठवड्यात मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जीवनात चढ-उतार येतील, कधी खूप आनंद होईल तर कधी विनाकारण नैराश्य येईल. पोटाच्या तक्रारी किंवा पचनाच्या समस्या त्रास देऊ शकतात, त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात मात्र हा काळ फायदेशीर आहे.
advertisement
6/6
कर्क - तुम्ही जर व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल, तर आठवड्याचा मध्य भाग तुमच्यासाठी चांगला आहे. कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना जोडीदाराचा किंवा घरातील मोठ्यांचा सल्ला नक्की घ्या.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे साप्ताहिक राशीफळ; फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा लकी, पण..