TRENDING:

Guess Who : पहिल्या पतीवर मारहाणीचा आरोप, दुसऱ्याचे विवाहबाह्य संबंध, प्रसिद्ध अभिनेत्री आज जगतेय असं आयुष्य

Last Updated:
Bollywood Actress : लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौर आज आपला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. दोन संसार मोडल्यानंतरही दलजीत खंबीर आहे. सध्या अभिनेत्री कसं जीवन जगतेय जाणून घ्या...
advertisement
1/7
दोन्ही संसार मोडले, प्रसिद्ध अभिनेत्री आज जगतेय असं आयुष्य
श्वेता तिवारी, जूही परमार, उर्वशी ढोलकिया आणि चाहत खन्ना यांसारख्या अनेक टीव्ही अभिनेत्री आहेत ज्यां आपल्या मुलांचा एकट्याने सांभाळ करत आहेत. यातीलच एक नाव म्हणजे दलजीत कौर. दोन संसार मोडल्यानंतरही दलजीत आज आपल्या बाळाचा एकट्याने सांभाळ करत आहे.
advertisement
2/7
दलजीत कौरने दोन लग्नांच्या अपयशानंतर आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. दलजीत कौरने आपली फिटनेस जर्नी सुरू केली आहे आणि तिचं म्हणणं आहे की, मागील एक वर्ष ती अनेक भावनिक चढ-उतारांमधून गेली आहे. या गोष्टीचा वाईट परिणाम तिच्या आरोग्यावर झाला.
advertisement
3/7
दलजीतने पहिलं लग्न 2009 मध्ये 'कुलवधू' मध्ये आपला सहकलाकार असणारा शालिन भनोटसोबत केलं होतं. 2014 मध्ये तिने एका मुलाला जन्म दिला. दलजीतने शालिनवर घरगुती अत्याचाराचा आरोप केला आणि या जोडप्याने 2015 मध्ये घटस्फोट घेतला.
advertisement
4/7
दलजीत कौरचं दुसरं लग्न मार्च 2023 मध्ये निखिल पटेलसोबत झालं होतं. त्यानंतर केनियामध्ये त्यांनी आपला संसार थाटला. पण पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे अभिनेत्री जानेवारी 2024 मध्ये आपल्या मुलासोबत भारतात परत आली.
advertisement
5/7
दलजीतचा जन्म 15 नोव्हेंबर 1982 मध्ये पंजाबमधील लुधियानामध्ये झाला. दलजीतने 'मंशा' या मालिकेच्या माध्यमातून 2004 मध्ये अभिनयक्षेत्रीत पदार्पण केलं. नच बलिए 4 ते बिग बॉस 13 या रिअॅलिटी शोचादेखील ती भाग राहिली आहे.
advertisement
6/7
दलजीतने आपल्या करिअरची सुरुवात 2004 मध्ये केली होती. या 20 वर्षांत तिने छोट्या पडद्यावरील अनेक मालिका आणि रिअॅलिटी शोमध्ये काम केलं आहे. पण अभिनेत्री नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे.
advertisement
7/7
दलजीत कौर आता मनोरंजनसृष्टीपासून दूर आहे. अभिनेत्री सध्या आपल्या मुलासोबत भारतात राहत आहे. एकट्याने आपल्या मुलाचा सांभाळ करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दलजीत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. चाहत्यांचा अभिनेत्रीला चांगलाच पाठिंबा मिळत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who : पहिल्या पतीवर मारहाणीचा आरोप, दुसऱ्याचे विवाहबाह्य संबंध, प्रसिद्ध अभिनेत्री आज जगतेय असं आयुष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल