अरे वाह! पुढील ७ दिवस ५ राशींसाठी ठरणार सर्वात भाग्यशाली, बक्कळ पैशांसह इच्छापूर्ती होणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Weekly Horoscope News : नोव्हेंबर 2025 महिन्याचा तिसरा आठवडा आता सुरू होण्याच्या तयारीत आहे. याच काळात मार्गशीर्ष महिन्यालाही प्रारंभ होत असल्याने हा आठवडा धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.
advertisement
1/6

नोव्हेंबर 2025 महिन्याचा तिसरा आठवडा आता सुरू होण्याच्या तयारीत आहे. याच काळात मार्गशीर्ष महिन्यालाही प्रारंभ होत असल्याने हा आठवडा धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. 17 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या आठवड्यात सूर्य आणि बुध वृश्चिक राशीत युती करणार असून त्यामुळे प्रभावशाली बुधादित्य राजयोग निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग संपत्ती, करिअर, व्यवसाय, प्रतिष्ठा आणि प्रगतीसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. या शुभ ग्रहयोगामुळे पाच राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. 17 ते 23 नोव्हेंबर या आठवड्यात कोणकोणत्या राशींना मोठा लाभ होणार आहे, ते पाहूया.
advertisement
2/6
मेष - मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ सूचक आहे. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि वरिष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. मालमत्ता, जमीन-जुमला, घर किंवा वाहन खरेदी-विक्रीशी संबंधित प्रलंबित बाबींमध्ये प्रगती होईल. नोकरी करणाऱ्यांना महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध आणि विवाह चर्चेसाठीही हा काळ अनुकूल आहे. आरोग्य मामुली असेल, परंतु चिंता करण्यासारखे काही नाही.
advertisement
3/6
मिथुन - या आठवड्याची सुरुवात मिथुन राशीसाठी अत्यंत सकारात्मक घडामोडींनी होणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा सहकार्य लाभेल. त्यांच्यामुळे अपूर्ण कामे जलद गतीने पूर्ण होतील. ज्यांना दीर्घकाळापासून नवीन नोकरीची किंवा बदलीची वाट पाहत आहेत, त्यांना शुभ बातमी मिळू शकते. घर खरेदी किंवा मालमत्तेशी संबंधित लाभदायक परिस्थिती निर्माण होईल. कौटुंबिक वातावरणात आनंद वाढेल आणि मानसिक समाधान मिळेल.
advertisement
4/6
कन्या - कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मागील कालावधीपेक्षा अधिक लाभदायक ठरणार आहे. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडाल. आर्थिक उत्पन्न वाढण्याची शक्यता असून नवीन कमाईचे मार्ग खुलतील. नोकरीत नवीन भूमिका किंवा अतिरिक्त जबाबदारी दिली जाऊ शकते ज्यामुळे करिअर प्रगतीची संधी वाढेल. वैवाहिक जीवनात समन्वय राहील. कुटुंबातील सदस्य तुमच्या पाठीशी उभे राहतील.
advertisement
5/6
तूळ - तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अत्यंत फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीला करिअरशी संबंधित मोठी बातमी मिळू शकते. नोकरीत पदोन्नतीची शक्यता असून पगारवाढीचाही संकेत आहे. जे लोक व्यवसाय करतात त्यांना या काळात मोठा फायदा मिळू शकतो. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठीही चांगल्या संधी उपलब्ध होतील. आरोग्य, कोर्ट-कचेरी किंवा आर्थिक तणावापासूनही दिलासा मिळेल.
advertisement
6/6
धनु - धनु राशीसाठी हा आठवडा अत्यंत शुभ आणि उर्जावान राहणार आहे. तुम्ही नियोजित सर्व कामे वेळेपूर्वी पूर्ण करू शकाल. नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रांत लाभ होईल. प्रवासातून आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रेमप्रकरणात सकारात्मक घडामोडी होतील आणि जोडीदारासोबतचे नाते अधिक दृढ होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
अरे वाह! पुढील ७ दिवस ५ राशींसाठी ठरणार सर्वात भाग्यशाली, बक्कळ पैशांसह इच्छापूर्ती होणार