दीपिका पदुकोणला आई झाल्याचा पश्चात्ताप? लेक दुआपासून हवाय ब्रेक, सोशल मीडियावर सगळंच सांगून टाकलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Deepika Padukone : नुकतीच दीपिकाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली एक स्टोरी सध्या प्रत्येक आईसाठी चर्चेचा विषय ठरली आहे. तिने सोशल मीडियावर एका रीलच्या माध्यमातून आपल्या मनातील भावना मांडली आहे.
advertisement
1/9

बॉलिवूडची 'मस्तानी' अर्थात दीपिका पादुकोण सध्या आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर टप्प्याचा आनंद घेत आहे. मुलगी दुआच्या जन्मानंतर दीपिकाचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलंय.
advertisement
2/9
नुकतंच दुआच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त तिचा चेहरा जगासमोर आणल्यानंतर, दीपिका आता हळूहळू आपल्या मातृत्वाच्या प्रवासातील मजेशीर आणि भावनिक अनुभव चाहत्यांशी शेअर करत आहे.
advertisement
3/9
नुकतीच तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली एक स्टोरी सध्या प्रत्येक आईसाठी चर्चेचा विषय ठरली आहे. दीपिकाने सोशल मीडियावर एका रीलच्या माध्यमातून आपल्या मनातील भावना मांडली आहे.
advertisement
4/9
तिने मिश्किलपणे लिहिलंय की, माझं टॉक्सिक ट्रेट हे आहे की, "मला माझ्या बाळावर इतकं प्रेम आहे की तिने कोणाकडेही बघू नये असं मला वाटतं... पण मला ब्रेकचीही खूप गरज आहे... पण मी तिच्याशिवाय राहू शकत नाही... मला दिवसातील २४ तास शांतता हवी आहे... पण तरीही मला २४ तास तिच्याच सोबत राहायचं आहे!"
advertisement
5/9
दीपिकाची ही पोस्ट वाचून अनेक आईंनी "हे तर अगदी आमच्या मनातलंच बोललीस!" अशा कमेंट्स करत तिला दाद दिली आहे. मुलांवरचं प्रेम आणि स्वतःसाठी हवा असलेला थोडा मोकळा वेळ यातील ही ओढाताण दीपिकाने अतिशय प्रांजळपणे मांडली आहे.
advertisement
6/9
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या 'WAVES 2025' समिटमध्ये दीपिकाने आई झाल्यानंतरच्या बदलांवर भाष्य केलं होतं.
advertisement
7/9
ती म्हणाली, "आई होणं हा माझ्यासाठी एक पुनर्जन्म आहे. आजवर माझं आयुष्य फक्त माझ्याबद्दल होतं, माझं घर, माझी महत्त्वाकांक्षा, माझं करिअर. पण आता अचानक माझ्याकडे एका अशा जीवाचा ताबा आहे, जो प्रत्येक गोष्टीसाठी पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहे. ही जबाबदारी मला जमिनीवर पाय ठेवून जगायला शिकवते."
advertisement
8/9
दीपिका आणि रणवीरने ठरवलं आहे की, दुआला एका सामान्य वातावरणात वाढवायचं. फिल्मी कुटुंबात जन्मल्यामुळे येणारा प्रसिद्धीचा दबाव तिच्यावर येऊ नये, यासाठी दीपिका खूप खबरदारी घेत आहे.
advertisement
9/9
मातृत्वाने तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असून, आता तिला छोट्या छोट्या गोष्टींतला आनंद अधिक महत्त्वाचा वाटू लागला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
दीपिका पदुकोणला आई झाल्याचा पश्चात्ताप? लेक दुआपासून हवाय ब्रेक, सोशल मीडियावर सगळंच सांगून टाकलं