TRENDING:

उद्या ब्लड मूनचा फोटो कधी क्लिक करता येणार? 'ही' वेळ ठरणार परफेक्ट

Last Updated:
खगोलप्रेमी आणि फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी उद्याची संध्याकाळ अत्यंत खास असणार आहे. उद्या, 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले 'खग्रास चंद्रग्रहण' लागणार असून, आकाशात 'ब्लड मून' पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
advertisement
1/7
उद्या ब्लड मूनचा फोटो कधी क्लिक करता येणार? 'ही' वेळ ठरणार परफेक्ट
खगोलप्रेमी आणि फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी उद्याची संध्याकाळ अत्यंत खास असणार आहे. उद्या, 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले 'खग्रास चंद्रग्रहण' लागणार असून, आकाशात 'ब्लड मून' पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, यंदा धुलिवंदनच्या दिवशीच हे ग्रहण येत असून, महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये चंद्रोदयाच्या वेळीच लालसर चंद्र पाहायला मिळणार आहे.
advertisement
2/7
ब्लड मून म्हणजे काय: खग्रास चंद्रग्रहणादरम्यान जेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, तेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणातून परावर्तित होऊन चंद्रावर पडतो. यामुळे चंद्र पूर्णपणे काळा न पडता तांबूस किंवा लालसर दिसतो, ज्याला 'ब्लड मून' म्हणतात. हा नजारा कॅमेऱ्यात टिपण्यासाठी सर्वोत्तम असतो.
advertisement
3/7
फोटोग्राफीसाठी 'ही' वेळ आहे परफेक्ट: महाराष्ट्रात ग्रहण सुटण्याची वेळ सायंकाळी 6:48 आहे. त्यामुळे चंद्रोदयापासून ते 6:48 पर्यंतची वेळ फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम असेल. या काळात चंद्र क्षितिजाच्या जवळ असल्याने तुम्हाला इमारती किंवा झाडांच्या पार्श्वभूमीवर अप्रतिम 'लँडस्केप' शॉट्स घेता येतील.
advertisement
4/7
मुंबईमध्ये चंद्रग्रहणाची वेळ काय असेल: अनेक खगोलप्रेमींना उत्सुकता लागली असेल की मुंबईमध्ये नेमकी ग्रहणाची वेळ काय असेल आणि ब्लड मूनचा परफेक्ट नजर कधी टिपता येणार आहे. तर मुंबईमध्ये संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी ब्लड मून पाहता येणार आहे. पण हे ग्रहण फक्त 3 मिनिटे म्हणजेच 6:45 ते 6:48 या वेळेतच दिसणार आहे.
advertisement
5/7
चंद्रग्रहण 3 मार्च रोजी दुपारी 3:20 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6:48 वाजता संपेल. जयपूरमध्ये चंद्र संध्याकाळी 6:29 वाजता उगवेल आणि ग्रहण संध्याकाळी 6:48 वाजता संपेल, ज्यामुळे ग्रहण कालावधी फक्त 18 मिनिटे राहील.
advertisement
6/7
भारतात चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 25 मिनिटे असेल. हे ग्रहण भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3:20 वाजता सुरू होईल आणि सायंकाळी 6:47 वाजता संपेल. दिल्लीत चंद्रोदय संध्याकाळी 6:22 वाजता होईल. त्यानंतरच भारतीय शहरांमध्ये ग्रहण दिसेल.
advertisement
7/7
भारतात चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी फक्त 25 मिनिटे असेल. दिल्लीमध्ये, चंद्रोदयाच्या वेळेनुसार ग्रहण फक्त 25 मिनिटे दिसेल. उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये, ग्रहणाचा कालावधी अंदाजे 59 मिनिटे असेल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
उद्या ब्लड मूनचा फोटो कधी क्लिक करता येणार? 'ही' वेळ ठरणार परफेक्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल