TRENDING:

Devoleena Bhattacharjee Birthday: ज्वेलरी डिझायनर ते गोपी बहू, देवोलीना कशी बनली TV ची क्वीन?

Last Updated:
Devoleena Bhattacharjee Birthday: छोट्या पडद्यावर ‘गोपी बहू’ म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी देवोलीना भट्टाचार्य. 22 ऑगस्टला ती तिचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवशी तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
advertisement
1/7
ज्वेलरी डिझायनर ते गोपी बहू, देवोलीना भट्टाचार्य कशी बनली TV ची क्वीन?
छोट्या पडद्यावर ‘गोपी बहू’ म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी देवोलीना भट्टाचार्य. 22 ऑगस्टला ती तिचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवशी तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
advertisement
2/7
एका गरीब घरातून आलेली ही मुलगी आज लाखो लोकांच्या हृदयात आपल्या अभिनयाने राज्य करते. देवोलीनाचे आयुष्य सोपे नव्हते. 11 वर्षांची असताना तिचे वडील वारले.
advertisement
3/7
घरची परिस्थिती बिकट होती, पण देवोलीनाने स्वप्नांचा त्याग केला नाही. ती ज्वेलरी डिझायनर म्हणून काम करू लागली, पण तिच्या मनातल्या कलाकाराला थांबवता आलं नाही.
advertisement
4/7
नृत्याची प्रचंड आवड असलेल्या देवोलीना एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना आहे. तिची पहिली झलक प्रेक्षकांना ‘डान्स इंडिया डान्स 2’ च्या ऑडिशन्समध्ये दिसली. त्यानंतर 2011 मध्ये ‘सावरे सबके सपने… प्रीतो’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पाऊल ठेवले.
advertisement
5/7
पण देवोलीना भट्टाचार्यला खरी ओळख मिळाली 2012 मध्ये जेव्हा तिने ‘साथ निभाना साथिया’मध्ये गोपी बहूची भूमिका साकारली. या मालिकेमुळे ती प्रत्येक घराघरात पोहोचली.
advertisement
6/7
देवोलीना फक्त मालिकांपुरती मर्यादित राहिली नाही. ‘लाल इश्क’, ‘दिल दियां गल्लन’ या मालिकांमध्ये ती झळकली, तर ‘बिग बॉस 14’, ‘बिग बॉस 14’ आणि ‘बिग बॉस 15’ मधील तिच्या एंट्रीमुळे तिचा वेगळाच चाहता वर्ग तयार झाला.
advertisement
7/7
14 डिसेंबर 2022 रोजी देवोलीनाने जिम ट्रेनर शाहनवाज शेखशी गुपचूप लग्न करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सुरुवातीला तिच्या आंतरधर्मीय लग्नावर बराच वाद झाला, पण देवोलीनाने ठामपणे सांगितलं, “हा माझा निर्णय आहे.” 2024 मध्ये देवोलीना आई बनली आणि तिच्या आयुष्यात खरा आनंद फुलला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Devoleena Bhattacharjee Birthday: ज्वेलरी डिझायनर ते गोपी बहू, देवोलीना कशी बनली TV ची क्वीन?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल