Dharmendra : धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Dharmendra Hospitalised : दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली असून त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
advertisement
1/7

 बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती अचानक खालावली असून त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
advertisement
2/7
 धर्मेंद्र यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचंही समोर आलं आहे. दुसरीकडे नियमित तपासणीसाठी ते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत अशीही माहिती आहे.
advertisement
3/7
 कुटुंबाशी संबंधित सूत्रांच्या मते, धर्मेंद्र यांच्या आरोग्यात कोणतीही गंभीर समस्या नाही, फक्त त्यांच्या वयाचा विचार करून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.
advertisement
4/7
 धर्मेंद्र सध्या त्यांच्या आगामी 'इक्कीस' या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसून आले होते. अशातच आता त्यांना रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समोर आल्याने चाहत्यांकडून काळजी व्यक्त केली जात आहे.
advertisement
5/7
 अभिनेता संबंधित एका जवळच्या सूत्राने माध्यमांशी बोलताना सांगितले की काळजी कोणतीही गरज नाही.
advertisement
6/7
 धर्मेंद्र लवकरच श्रीराम राघवन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘इक्कीस’ या चित्रपटात दिसणार आहेत. यात अभिनेता अगस्त्य नंदाचे आजोबा यांचे पात्र साकारताना ते दिसतील. ही कथा अरुण क्षेत्रपाल यांच्या आयुष्यावर आधारित आहे.
advertisement
7/7
 धर्मेंद्र यांनी 70-80 चं दशक चांगलच गाजवलं असून आजही या वयात ते चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. तसेच सोशल मीडियावरही ते खूप सक्रिय असतात आणि आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी आजवर अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. चाहत्यांकडूनच त्यांना ‘ही-मन’ हा टॅगही मिळाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dharmendra : धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल