TRENDING:

1 तास 47 मिनिटांची आतापर्यंतची सर्वात खतरनाक हॉरर फिल्म; रात्री एकटं पाहण्याची अजिबात करू नका हिंमत

Last Updated:
Most Spine-Chilling Horror Movie : हॉरर चित्रपटांच्या दुनियेत काही कथा फक्त भीती निर्माण करत नाहीत, तर मनात दडलेली भीती बाहेर काढण्याचं काम करतात. अशा परिस्थितीत जेव्हा एखादी फिल्म तुम्हाला भीतीसोबत विचार करण्यासही भाग पाडते, तेव्हा तिचा प्रभाव आणखी खोलवर होतो. आज आम्ही तुम्हाला आतापर्यंतच्या खतरनाक हॉरर चित्रपटाबद्दल सांगणार आहोत.
advertisement
1/7
1 तास 47 मिनिटांची आतापर्यंतची सर्वात खतरनाक हॉरर फिल्म; एकट्यात पाहूच नका
आतापर्यंतच्या सर्वात खतरनाक हॉरर चित्रपटात फक्त भूत-प्रेत किंवा आत्म्यांची कथा दाखवण्यात आलेली नाही. तर समाजात पसरलेल्या महिला उत्पीडन, मानसिक संघर्ष आणि असमानता या सारख्या विषयांवर खूप बारकाईने भाष्य करण्यात आलं आहे.
advertisement
2/7
चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी, 70 च्या दशकाची झलक आणि रुग्णालयाचं वातावरण यामुळे हा चित्रपट आणखी भयानक बनला आहे. दिग्दर्शकाने हॉररच्या दुनियेला नवीन दृष्टिकोन दिला आहे. जिथे भीतीसोबत एक संदेशही दडलेला आहे, जो तुम्हाला घाबरवण्यासोबतच अनेक प्रकारच्या गुंतागुंतीतही टाकेल.
advertisement
3/7
सर्वात खतरनाक हॉरर चित्रपट तुम्ही एकटं असताना करुच शकत नाही. सिनेमा पाहिल्यानंतर तुमच्या मनात इतकी भीती निर्माण होईल की तुम्ही नाईट शिफ्ट करण्यापासूनच घाबरू लागाल. ही एक स्पॅनिश हॉरर फिल्म आहे, ज्याचे दिग्दर्शन रिगोबर्टो कास्टानेडा यांनी केले आहे.
advertisement
4/7
24 जून, 2025 रोजी हा चित्रपट अमेरिकेत रिलीज झाला होता. यात पॉलिना गैटन, टोनी डॉल्टन, इझुआ लारिओस आणि अझुल गुइटा मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटात एका नर्सची गोष्ट दाखवण्यात आली आहे. जी तिच्या भूतकाळातील हिंसा आणि वेदना सोसत एका लहान रुग्णालयात नाईट शिफ्ट करत असते, जिथे तिला भयानक घटनांचा सामना करावा लागतो.
advertisement
5/7
नाईट शिफ्टदरम्यान तिला एका नर्सच्या भयानक आत्म्याचा सामना करावा लागतो. चित्रपटाची कथा ‘यूलिया ला प्लांचाडा’ (Eulalia La Planchada) वर आधारित आहे. असे म्हटले जाते की ही नर्स मेक्सिको सिटीमधील Juárez हॉस्पिटल मध्ये काम करत होती आणि मरणानंतरही तिची आत्मा तिथे रुग्णांची काळजी घेत असतो. चित्रपटात रुग्णालयाच्या अंधाऱ्या गल्ली, नर्सचा मानसिक ताण आणि भुतांसारख्या घटनांना अतिशय प्रभावी पद्धतीने दाखवले आहे. तसेच, यात फ्रेडी क्रूगर सारख्या हॉरर आयकॉनलाही श्रद्धांजली दिली आहे.
advertisement
6/7
IMDb वर या चित्रपटाला 5.2/10 ची रेटिंग मिळाली आहे आणि त्याला दोन पुरस्कारांसाठी नॉमिनेशन मिळाले होते. चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मिश्रित प्रतिसाद मिळाला. काही लोकांनी याला ‘इंस्टंट हॉरर क्लासिक’ म्हटले, तर काहींना मात्र या चित्रपटाचं कथानक खटकलं. चित्रपटातील 70 च्या दशकातील थीम, लायटिंग आणि बॅकग्राउंड म्युझिक याचे विशेष कौतुक केले गेले.
advertisement
7/7
सस्पिरिया-स्टाईल व्हिज्युअल्समुळे या चित्रपटाला एक क्लासिक हॉरर टच मिळाला आहे. चित्रपटाचं बजेट सुमारे 3 मिलियन डॉलर्स, म्हणजेच अंदाजे 25 कोटी रुपये होतं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 6.5 मिलियन डॉलर्स, म्हणजेच सुमारे 54 कोटी रुपये कमावले. क्लॅव्हियर डिस्ट्रीब्यूशनने हा चित्रपट रिलीज केला आणि नंतर तो 8 मार्च 2024 रोजी प्राइम व्हिडिओ, अॅपल टीव्ही आणि गूगल प्ले मुव्हीजवर रिलीज झाला. भारतात हा चित्रपट सध्या कोणत्याही मोठ्या OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नाही, पण अशी अपेक्षा आहे की लवकरच तो नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओवर दिसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
1 तास 47 मिनिटांची आतापर्यंतची सर्वात खतरनाक हॉरर फिल्म; रात्री एकटं पाहण्याची अजिबात करू नका हिंमत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल