TRENDING:

Dharmendra : धर्मेंद्र यांनी शब्द दिला पण अपूर्ण राहणार सलमान खानची ती इच्छा

Last Updated:
धर्मेंद्र यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात शोककळा, सलमान खान भावूक. 60 वर्षात 300हून अधिक सिनेमे, शेवटचा सिनेमा इक्कीस 25 डिसेंबरला रिलीज होणार.
advertisement
1/6
Dharmendra : धर्मेंद्र यांनी शब्द दिला पण अपूर्ण राहणार सलमान खानची ती इच्छा
धर्मेंद्र मनोरंजन विश्वातलं एक मोठं नाव, आज ते काळाच्या पडद्याआड गेल्यानं मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. विलेपार्लेमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
advertisement
2/6
पुढच्या सीझनमध्ये तुम्हाला नक्की यायचं आहे असं सलमान खान म्हणाला. मात्र त्याची ही इच्छा आता कधीच पूर्ण होणार नाही. बिग बॉसच्या 19 व्या सीझनला धर्मेंद्र यांनी पुन्हा यायला हवं असं सलमान खान म्हणाला होता. तेव्हा धर्मेंद्र म्हणाले नक्की येईन. तुझ्यावर प्रेम आहे तू माझा मुलगा आहे अगदी माझ्यावर गेलायस असं म्हणून ते हसायला लागले. त्यांच्या या मिश्कील बोलण्याने एकाच हशा पिकला होता.
advertisement
3/6
love u, god bless you खुश राहा असं म्हणत त्यांनी सलमान खानला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. हेच आशीर्वाद पुन्हा मिळणार नाहीत. याचा शोक सलमानला आहे. आज ते पाठ थोपटायला नाहीत. याची खंत मनात आयुष्यभर राहणार आहे.
advertisement
4/6
सलमान खानने बोलून दाखवलेली ती इच्छा आता कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. बिग बॉस 19 मध्ये त्यांनी यावं असं मनापासून वाटत होतं. ती इच्छा त्यांनी बोलूनही दाखवली. मात्र आज धर्मेंद्र यांचं निधन झाल्याची बातमी आल्यानंतर सलमान खान आतून पूर्ण कोलमडून गेला आहे. त्या दोघांमध्ये वडील मुलासारखं नातं होतं हे कायमच चाहत्यांना पाहायला मिळालं आहे.
advertisement
5/6
धर्मेंद्र यांना ब्रिज कॅण्डि हॉस्पिटलमधून घरी आणलं होतं. 12 दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यांच्यावर जुहू येथील त्यांच्या घरी पुढील उपचार सुरू होते. उपचारांती त्यांची प्राणज्योत मालवली असून त्यांनी या जगाचा निरोप घेतला.धर्मेंद्र यांच्या निधनाची माहिती समोर येताच देओल कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
advertisement
6/6
धर्मेंद्र यांनी त्यांच्या अभिनय कारकीर्दीत आतापर्यंत 300 हून अधिक सिनेमात काम केलं. तब्बल 60 वर्ष त्यांनी हिंदी सिनेसृष्टीवर राज्य केलं. त्यांचा इक्कीस हा शेवटचा सिनेमा ठरला. इक्कीस हा सिनेमा येत्या 25 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. काही तासांआधीच इक्कीस या सिनेमातील धर्मेंद्र यांचं पोस्टर रिलीज करण्यात आलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dharmendra : धर्मेंद्र यांनी शब्द दिला पण अपूर्ण राहणार सलमान खानची ती इच्छा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल