Sanjay Jadhav Daughter : मराठमोळ्या संजय जाधवांची लेक, बोल्डनेसमध्ये अभिनेत्रींना देते टक्कर, काय करते काम?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Sanjay Jadhav Daughter : अनेक सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक संजय जाधव यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही! पण तुम्हाला माहीत आहे का, त्यांची मुलगी ध्रिती जाधव ही देखील काही कमी नाही.
advertisement
1/6

मराठी सिनेसृष्टीला 'दुनियादारी' आणि नुकताच प्रदर्शित झालेला 'येरे येरे पैसा ३' सारखे सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक संजय जाधव यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही! त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना वेड लावलं.
advertisement
2/6
पण तुम्हाला माहीत आहे का, त्यांची मुलगी ध्रिती जाधव ही देखील काही कमी नाही. वडिलांप्रमाणे तिने दिग्दर्शनाची वाट निवडली नसली तरी, ती एका वेगळ्याच क्षेत्रात आपलं नाव कमावतेय आणि तेही तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजात!
advertisement
3/6
ध्रितीला सोशल मीडियावर 'डान्सिंग सिंबा' या नावाने ओळखलं जातं. तिचे डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालतात. तिचा प्रत्येक व्हिडीओवर तिचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. ध्रितीचा डान्स पाहताना तुम्हीही तिच्या स्टेप्सवर फिदा व्हाल, इतका तिचा डान्स एनर्जेटिक असतो.
advertisement
4/6
पण ध्रिती फक्त डान्सर नाही, तर ती पेशाने सोशल मीडिया मॅनेजर म्हणूनही काम करते. अनेक मोठे ब्रँड्स आणि रेस्टॉरंट्सचं सोशल मीडिया ती उत्तम सांभाळते. ती फक्त कॅमेऱ्यासमोर नाही, तर पडद्यामागेही तिचं काम चोख करते. प्रसिद्ध कलाकार नील सालेकर आणि मनमीत पेम हे तिचे चांगले मित्र आहेत, जे तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये अनेकदा दिसतात.
advertisement
5/6
ध्रितीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नजर टाकल्यास तुम्हाला तिचे अनेक हॉट आणि बोल्ड फोटो पाहायला मिळतील. आज ध्रिती जी काही आहे, त्यात तिचे वडील संजय जाधव यांचा मोलाचा वाटा आहे. आपल्या लेकीला तिच्या आवडीनुसार करिअर निवडण्याचं आणि हवं ते करण्याचं स्वातंत्र्य संजय यांनी दिलं आहे. त्यांनी ध्रितीला नेहमीच पाठिंबा दिला आहे, ज्यामुळे तिला आपल्या पंखांना बळ देता आलं.
advertisement
6/6
संजय आणि ध्रिती, या बापलेकीची जोडी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. एका बाजूला संजय जाधव यांचा 'येरे येरे पैसा ३' बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, तर दुसरीकडे ध्रिती तिच्या डान्स आणि सोशल मीडियातील करिअरने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतेय. वडिलांच्या लोकप्रियतेचा फायदा न घेता, स्वतःच्या टॅलेंटवर ध्रितीने हे यश मिळवलं आहे, हे खरंच कौतुकास्पद आहे!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sanjay Jadhav Daughter : मराठमोळ्या संजय जाधवांची लेक, बोल्डनेसमध्ये अभिनेत्रींना देते टक्कर, काय करते काम?