TRENDING:

Dhurandhar 2 मध्ये रणवीर सिंहच्या एंट्रीवेळी वाजलेलं अरबी Song Didi, या गाण्याचा अर्थ काय?

Last Updated:
Dhurandhar 2 Didi Song Meaning : 'धुरंधर'मध्ये अक्षय कुमारच्या एंट्रीवेळी वाजलेल्या Fa9la गाण्याप्रमाणेच आता 'धुरंधर 2'मध्ये रणवीर सिंगच्या एंट्रीवेळी वाजलेलं Didi गाणंही लोकप्रिय झालं आहे.
advertisement
1/11
Dhurandhar 2 मध्ये रणवीर सिंहच्या एंट्रीवेळी वाजलेलं अरबी Song Didi, या गाण्याचा अर्थ काय?
धुरंधर फिल्ममध्ये अक्षय कुमारच्या एंट्रीचं साँग Fa9la चांगलंच हिट झालं होतं. अक्षय कुमार म्हणजे रहमान डकैतचा वेगळाच स्वॅग दाखवण्यात आला. या गाण्यावर लोक थिरकू लागले, हे गाणं कुणाचं, ते कुणी गायलं, त्या गाण्याचं अर्थ सगळं काही लोकांनी शोधलं. आता धुरंधर 2 मध्येही रणवीर सिंगच्या एंट्रीवेळी असंच एक गाणं वाजवण्यात आलं आहे.या गाण्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
2/11
धुरंधर द रिव्हेंजमध्ये रणवीर सिंगच्या एंट्रीवेळी Didi हे गाणं वाजतं. हे गाणं काही नवीन नाही तर तो 1990 च्या दशकातील एक इंटरनॅशनल हिट ट्रॅक आहे.
advertisement
3/11
अल्जेरियन गायक खालिद जावेदचं दीदी गाणं, 1992 साली त्याने स्वतःच्या 'खालिद' नावाच्या अल्बममध्ये प्रदर्शित केलं.  अल्जेरियामध्ये जन्मलेल्या या गाण्याला जगभरात ओळख मिळेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. गाण्याचे बोल समजायला कठीण होते, पण चाल आणि तालाने या भाषिक आव्हानावर मात केली.
advertisement
4/11
हे गाणं मध्य पूर्व, युरोप, आशियामधील अनेक देशांमध्ये लोकप्रिय झालं. फ्रान्सच्या टॉप 50 यादीत जवळपास पाच महिने टिकून राहिलं. स्वित्झर्लंड, बेल्जियम आणि इजिप्तसारख्या देशांमध्येही ते पहिल्या क्रमांकावर पोहोचलं. या गाण्याची लोकप्रियता अनेक वर्षे टिकून राहिली.
advertisement
5/11
2010 च्या फिफा विश्वचषकाची सुरुवात याच गाण्याने झाली. हे गाणं यापूर्वी बॉलिवूडमध्ये वापरलं गेलं आहे. आता धुरंधर 2 मुळे या गाण्याला नवसंजीवनी मिळत आहे.
advertisement
6/11
विशेष म्हणजे हे गाणं फिल्ममधील शेर-ए-बलुचच्या एन्ट्री सीनसोबत जोडण्यात आलं आहे, ज्यामुळे त्याचा प्रभाव अधिकच वाढला आहे. 'शेर-ए-बलुच' या शब्दाचा अर्थ 'बलुचांचा सिंह' असा होतो म्हणजेच एक शक्तिशाली, प्रभावशाली नेता किंवा व्यक्ती.
advertisement
7/11
चित्रपटात रणवीर सिंगच्या पात्राला याच ओळखीसह सादर केलं आहे, त्यामुळे हे गाणं केवळ मनोरंजनासाठीच नाही तर पात्राची ताकद दाखवण्यासाठीही वापरलं आहे.
advertisement
8/11
'दिदी' हे एक अरबी-पॉप गाणं आहे. जे प्रेम, आकर्षण आणि उत्कटतेच्या भावना दर्शवतं. हे गाणं एका खास व्यक्तीबद्दलची उत्कटता आणि वेड व्यक्त करतं. याची चाल इतकी आकर्षक आहे की भाषा समजत नसली तरी लोक आपोआप त्यावर नाचू लागतात.
advertisement
9/11
या गाण्यातील 'दिदी' या शब्दाचा अर्थ एक सुंदर मुलगी असा आहे, जो हिंदी चित्रपटांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 'हसीना' आणि 'जाना' या शब्दांसारखाच आहे.
advertisement
10/11
हे गाणं ऐकताच अनेक लोक थिरकत आहे. पण प्रत्यक्षात हे एक सॅड साँग आहे.  गाण्यात "मी प्रेमाच्या आगीत जळत आहे. मला सोडून जाऊ नकोस", "माझं नशीब वाईट आहे, पण तू माझ्यासोबत राहतोस", अशा ओळी आहेत.
advertisement
11/11
या गाण्यात एक प्रियकर एकतर्फी प्रेमात आहे. गाण्याचे बोल एका प्रियकराच्या त्यागाबद्दल सांगतात. तो प्रियकर म्हणतो, "तू माझ्यावर प्रेम करत नाहीस हे माहीत असूनही, मी तुझ्या प्रेमाच्या आगीत जळत आहे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhurandhar 2 मध्ये रणवीर सिंहच्या एंट्रीवेळी वाजलेलं अरबी Song Didi, या गाण्याचा अर्थ काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल