TRENDING:

Drishyam 3 : 'दृश्यम 3'ची स्टोरी काय? दिग्दर्शकाने दिली मोठी हिंट

Last Updated:
Drishyam 3 : 'दृश्यम 3' या बहुचर्चित चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनी याबाबत मोठी हिंट दिली आहे.
advertisement
1/7
Drishyam 3 : 'दृश्यम 3'ची स्टोरी काय? दिग्दर्शकाने दिली मोठी हिंट
'दृश्यम' या फ्रेंचायजीने प्रेक्षकांना चांगलच वेड लावलं आहे. मूळ मल्याळम असलेल्या या चित्रपटाच्या हिंदी रिमेकचा प्रत्येक जण मोठा चाहता आहे. आता प्रत्येकाला 'दृश्यम 3' या बहुप्रतीक्षित चित्रपटाची आतुरता आहे. अशातच दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनी या चित्रपटाच्या कथानकाबाबत मोठी हिंट दिली आहे.
advertisement
2/7
मोहनलाल स्टारर मल्याळम फिल्मचे दिग्दर्शक जीतू जोसेफ क्राइम थ्रिलर ड्रामाचे मास्टरमाइंड आहेत. जीतू जोसेफ यांनी याआधीच जाहीर केलं आहे की, 'दृश्यम 3' हा चित्रपट मल्याळमसह हिंदी भाषेतदेखील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता जीतू यांनी कथानकाबाबत मोठी हिंट दिली आहे.
advertisement
3/7
मोहनलाल, मीना, अंसिबा हसन आणि एस्थर अनिल स्टारर 'दृश्यम 3' हा चित्रपट सुरुवातीपासूनच चांगलाच चर्चेत आहे. आता इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत जीतू जोसेफ म्हणाले की,"मी आतापर्यंत फक्त एकच फ्रेंचाइज बनवली आहे ती म्हणजे दृश्यम. यासाठी मी एका ऑर्गेनिक पद्धतीचा वापर केला आहे".
advertisement
4/7
जीतू जोसेफ म्हणाले,"दृश्यम पार्ट 3'च्या घोषणेनंतर अनेकांनी मला सांगितलं की 'दृश्यम 2'ची स्क्रिप्ट खूप कमाल होती आणि आता 'दृश्यम 3'कडून अपेक्षा वाढल्या आहेत. पण माझा फोकस सध्या जॉर्जकुट्टी आणि त्याच्या कुटुंबियांवर आहे. पार्ट 2 नंतर सात वर्षांनी त्याचं आयुष्य कसं असेल या गोष्टीवर मी लक्ष देत आहे. पण मी जाणूनबुजून 'दृश्यम 2'पेक्षा उत्कृष्ट संहिता बनवण्यावर भर देत नाही आहे".
advertisement
5/7
जीतू जोसेफ पुढे म्हणाले,"जॉर्जकुटी आणि त्याचे कुटुंबिय बदलत्या वेळेसोबत कसे बदलत आहे हे दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल. 'पार्ट 2' हिट झाल्यामुळे 'पार्ट 3' सुपरहिट करण्यासाठी मी काही विशेष प्रयत्न करत नाही आहे. ऑर्गेनिक पद्धतीनेच काम सुरू आहे".
advertisement
6/7
जॉर्जकुट्टी आणि त्याच्या कुटुंबियांच्या आयुष्यात काय घडू शकतं यावर आधारित कथानक असेल. 'दृश्यम पार्ट 3' रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांना नक्कीच कळेल. 'दृश्यम 2' हा चित्रपट पहिल्या 'दृश्यम'पेक्षा वेगळा होता. त्याप्रमाणेच 'दृश्यम 3' हा चित्रपट 'पार्ट 2'पेक्षा वेगळा असेल.
advertisement
7/7
'दृश्यम' या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 67.14 कोटींचा गल्ला जमवला होता. तर 'दृश्यम 2' या चित्रपटाने भारतात 238.99 कोटींची कमाई केली. आता 'दृश्यम 3' किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Drishyam 3 : 'दृश्यम 3'ची स्टोरी काय? दिग्दर्शकाने दिली मोठी हिंट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल